प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला किती मोठं नुकसान पोहोचतं हे अनेकदा आपण वाचत आलोय, पाहत आलोय. आपण सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या रस्त्याकडेला फेकतो, समुद्रात नद्या नाल्यांत फेकून देतो. प्लॅस्टिकच विघटन व्हायला हजारो वर्षे लागतात तेव्हा हे प्लॅस्टिक हळूहळू पर्यावरण आणि इथे राहणाऱ्या अनेक प्राणी पक्षांच्या ऱ्हासाचं कारण ठरत चाललं आहे. आजही सागरीजीवांच्या पोटात प्लॅस्टिकच्या पिशव्या सापडत आहेत. गुरंही चारा समजून प्लॅस्टिकच्या पिशव्या खात आहे. तेव्हा प्लॅस्टिक हे निर्सगासाठीच काय पण निर्सगात राहणाऱ्या प्रत्येक घटकाच्या नाशाचं कारण ठरतंय. गोव्यात असाच एक प्रकार पाहायला मिळाला. भक्ष समजून एका सापाने चक्क प्लॅस्टिकची बाटली गिळली. तुम्हालाही विश्वास बसत नाहीये ना? मग हा व्हिडिओ पाहाच. प्लॅस्टिकची बाटली गिळल्यानंतर हा साप ती बाटली बाहेर काढण्याठी धडपडत होता. अशा विचित्र अवस्थेत असलेल्या सापावर गावकऱ्यांची नजर गेली. त्यांनी या सापाला पाहाताच सर्पमित्राला बोलावून घेतले. शेवटी सर्पमित्र गौतम भगत मदतीला धावून आले. त्यांनी ही प्लॅस्टिकची बाटली बाहेर काढली आणि या सापाचे प्राण वाचवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Viral : हा व्हिडिओ पाहण्यासाठी मन घट्ट करा!

असे अनेक प्राणी आहेत जे अन्न समजून चुकून प्लॅस्टिकच्या पिशव्या गिळतात आणि मृत्युमुखी पडतात. काही दिवसांपूर्वी ‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनेलने एक माहितीपट समोर आणला होता. प्लॅस्टिक इतक्या मोठ्या प्रमाणात समुद्रात फेकलं गेलं होतं की प्रशांत महासागरात या प्लॅस्टिकचं बेटच तयार झालं होतं. इथे आढळणाऱ्या अनेक सागरी जीवांच्या पोटात चक्क प्लॅस्टिक आढळलं होतं. त्यामुळे ही समस्या किती भीषण होत चालली आहे याची आपण कल्पना करू शकतो. तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाने प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या या चांगल्या सवयीमुळे कदाचित थोड्या प्रमाणात का होईना पण पर्यावरणाचं मोठं नुकसान टळू शकतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of a snake vomiting a plastic bottle goa
First published on: 30-05-2017 at 10:59 IST