Viral Video : भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याने रस्ते नाले भरलेले दिसत आहे ज्याचा थेट परिणाम वाहतूक कोडींवर दिसून येत आहे. याचा सर्वात जास्त त्रास ९ ते ५ नोकरी करणाऱ्या लोकांवर होत आहे कारण कंपनीकडून वर्क फ्रॉम होमची सुविधा मिळत नसल्याने भर पावसात यांना ऑफिस जावे लागत आहे. अशातच ऑफिस जाणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण पावसात भिजून दुचाकी चालवताना दिसत आहे आणि मजेशीरपणे ऑफिसमधील टॉक्सिक वर्क कच्लरविषयी सांगतो. तो काय म्हणतो, हे आज आपण व्हिडीओच्या माध्यामातून जाणून घेणार आहोत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. तो पावसाच्या पाण्यात भिजत दुचाकी चालवत आहे. या दरम्यान त्याने हा मजेशीर व्हिडीओ बनवला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण सांगतो, “मी कामावर जात आहे. मी सेल्सचं काम करतो. टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे. त्यामुळे सेल्ससाठी निघालोय. हेल्मेट घातले. मी वॉटरप्रुफ आहे मित्रांनो, आहे ना मी वॉटरप्रुफ पर्सन? मी भिजू शकत नाही. मी कामावर जातोय. टार्गेट पूर्ण व्हायला पाहिजे. टार्गेट पूर्ण होईल तरच सेल्स वाढणार. इतका माल विकणार की कंपनी वर असेल आणि आम्ही खाली असणार. एकदम मजाच मज्जा! कंपनीचा सेल व्हायला हवा.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओच्या माध्यमातून हा तरुण खोचकपणे टोला लगावत सांगताना दिसतो की पाऊस पडो किंवा काहीही झाले तरी कंपनीला सेल्स पूर्ण झालेले पाहिजे, मग कर्मचारी पावसात कितीही भिजलेले का असो!
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कंपनीच विकून दे भावा” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक ठिकाणी आहे टॉक्सिक वर्क कच्लर” आणखी एका युजरने लिहिलेय, “रेनकोट घे ना भावा” एका युजरने मजेशीरपणे विचारलेय, “टार्गेट पूर्ण झाले का?” तर एक युजर लिहितो, “मी हे समजू शकतो.. जे लोक या गोष्टीचा सामना करत आहे, तेच या तरुणाच्या भावना समजू शकतात” या व्हिडीओच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत