Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, आपुलकी अन् जिव्हाळा असतो. दोन व्यक्ती लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरूवात करतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. लग्नानंतर जेव्हा नवीन संसार सुरू होतो, तेव्हा एकमेकांचा स्वभाव हळू हळू समजायला लागतो. कधी कठीण काळात एकमेकांना साथ देतात तर कधी एकमेकांच्या चुका पदरात घेतात. असं करता करता संसार फुलत जातो. म्हातारपणात नवरा बायकोला एकमेकांच्या आधाराची खूप जास्त गरज असते. पण इथपर्यंत पोहचायला आणि एकमेकांवर खूप प्रेम करायला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वृद्ध जोडपं दिसेल. हे आज्जी आजोबा एकमेकांची किती काळजी घेतात, हे तु्म्हाला या व्हिडीओतून दिसून येईल.
पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा जेवण करत आहे आणि आज्जी त्यांच्या शेजारी बसून त्यांना जेवण वाढत आहे. त्यानंतर आज्जी स्वत:साठी ताट वाढते आणि आजोबांबरोबर जेवायला बसते. पुढे व्हिडीओत आजोबा आज्जीच्या डोळ्यात ड्रॉप सुद्धा टाकताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या आज्जी आजोबांची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
rannliveshere या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जुने लोक, जुने वचन आणि कधीही न संपणारे प्रेम”
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक वृद्ध जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. कधी वृद्ध जोडपे डान्स करताना दिसतात कर कही हे वृद्ध जोडपे गाणी म्हणताना दिसतात. या वयात त्यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम, काळजी अन् जिव्हाळा पाहून तरुण पिढीने त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे.