Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. काही लोक इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे व्हिडीओ तुफान चर्चेत येतात. सध्या एका आजीबाईचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही आजीबाई मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. आजीबाईचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. एका कार्यक्रमात आजीबाई डान्स करत आहे. (video of an old lady dance on mich majhya rupachi rani g marathi song video goes viral on social media)

या व्हायरल व्हिडीओ एका होम मिनिस्टर कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतलेला दिसून येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही महिला डान्स करत आहे. या महिलांबरोबर एक आजीबाई सुद्धा डान्स करत आहे. आजीबाईच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजीबाई मनसोक्त डान्स करत आनंद लुटताना दिसत आहे. ‘मी कशाला आरशात पाहू गं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

kiranpatil_homeminister या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “आईने डान्स केला खूप सुंदर, डोक्यावरचा पदर पडलेला नाही, हीच खरी संस्कृती” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान वाटल ही रील बघून या वयात पण खूप उत्साह आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीबाईचा उत्साह ओसंडून वाहत आहे” एक युजर लिहितो, “इन्स्टा वरचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ” तर एक युजर लिहितो, “पदर डोक्यावरचा खाली नाही.बघा कीती छान ही आपली संस्कृती” अनेक युजर्सनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर वृद्धांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. वृद्धांच्या व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस लवकर उतरतात. नेटकरी यांच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करतात.