Video : आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही! नातीला खूश करण्यासाठी केला डान्स, आजोबा नातीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा त्यांच्या नातीबरोबर डान्स करताना दिसत आहे. आजोबा आणि नातीचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आजोबांचं प्रेम : आजोबा नातीचा व्हिडीओ व्हायरल (Photo : Insta)
Viral Video : आजोबा आणि नातवंडाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी अन् जिव्हाळा दिसून येतो. आजोबा नातवंडांना आनंदी ठेवण्यासाठी वाट्टेल ते करतो. असं म्हणतात नातवंड हे आजोबांच्या आयु्ष्यातील शेवटचे मित्र असतात तर नातवंडांसाठी आजोबा हे पहिले मित्र असतात. या नात्यात रुसवा फुगवी, मजा, मस्ती दिसून येते. नाववंडांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आजोबा वाट्टेल ते करायला तयार होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा त्यांच्या नातीबरोबर डान्स करताना दिसत आहे. आजोबा आणि नातीचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आजोबांचं असं प्रेम प्रत्येकाला मिळत नाही! या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आजोबा आणि त्यांची नात दिसेल. हे दोघेही कुछ कुछ होता है या चित्रपटातील यह कैसा लड़का है या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल नातीसाठी आजोबा एका पायावर बसलेले दिसत आहे आणि लिरिक्स गात थोड्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजोबा नातीबरोबर डान्सचा आनंद लुटताना दिसतात आणि शेवटी एकमेकांना मिठी मारतात. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे आजोबा आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
ashwini.gavali.357 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नातीसाठी काय पण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त” तर एका युजरने लिहिलेय, “आत्तापर्यंत सर्वात छान पाहिलेला व्हिडिओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “जगातला खूप भारी व्हिडिओ आजोबा आणि नातीचा एकच नंबर” एक युजर लिहितो, “निःस्वार्थी प्रेम म्हणजे हेच ते” तर एक युजर लिहितो, “नातवांसाठी आजी आजोबा काहीही करायला तयार असतात…नक्कीच त्यांनी जे आपल्या मुलांसाठी केलेलं नसत ते सर्व आपल्या नातवंडासाठी करतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आजोबा आणि नातीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सन या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.