Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही लोक त्यांचे अनुभव शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणीने एका आजोबाबरोबर संवाद साधला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.

तरुणी – तुमच्या पत्नीची कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आजही आठवते?

आजोबा – पूर्ण ती आठवते

तरुणी – तुमच्या आयुष्यात असा कोणता दु:खी क्षण राहिला आहे, ज्याविषयी तुम्ही आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही.

आजोबा – दु:खी क्षण आला नाही एक पत्नी होती, तिचे निश्चित दु:ख होते, पण आता ती नाही. तिचे ऑपरेशन केले पण ऑपरेशन यशस्वी झाले नाही. तिचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला.
असं म्हणतात आपली पत्नी ही आपल्या घरची लक्ष्मी असते. जसं तुम्हाला सांगितले ती नाही. ती खूप मोठी संपत्ती आहे. या पत्नीशिवाय आयुष्य चांगले नाही.

तरुणी – त्यांची अशी कोणती गोष्ट आहे, जे तुम्हाला आजही आठवते?

आजोबा – तिची आठवण तर दिवसभर येते. त्यानंतर ते खिशातून एक पाकिट काढतात. पैशांच्या पाकिटात ते दोन फोटो ठेवलेले दाखवतात. त्यात त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असतो.

तरुणी – तुम्ही आजही त्यांचा फोटो आपल्याबरोबर ठेवता?

आजोबा – असं म्हणतात ना यापेक्षा जास्त प्रेम कोणाजवळ नसते. पती पत्नी आहे देव सांगतो बनवायला. कोणी नसते, आई नाही , वडील नाही, मुलं बाळ नसतात . ती गेली आहे मी नाही मानत. मला आनंद आहे की ती आमच्याजवळ आहे. आमच्याजवळ २४ तास आहे

तरुणी – अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्हाला आजही आठवते?

आजोबा – ती पूर्ण आठवते. आयुष्य जेव्हा आपण कोणाबरोबर जगतो, जितका वेळ सोबत जगतो, आयुष्य सुधारते, माणूस स्वीकारत नाही. पण जे झाले, काय करणार. वेळ घालवायचा आहे. या जगात कोणी सुखी नाही कुठे सुख आहे कुठ दु:ख आहे. पण दु:ख मानत नाही. सुख मानतो. मी मानते की ती माझ्याजवळ आहे. तिच्याजवळ माझे प्रेम आहे. एक गोष्ट सांगते, ती माझ्याजवळ जो पर्यंत होती तेव्हा मी कुठे जायचो तर १२ पर्यंत रात्री परत यायचो, ती तोपर्यंत जेवण करायची नाही. मला जेवण वाढायची. आल्यानंतर आम्ही दोघे मिळून जेवायचो. एवढं प्रेम करायची ती माझ्यावर. माझं पण तिच्यावर प्रेम होतं.

तरुणी – मला आशा आहे, तुमचा दिवस चांगला जाईल. आणि ती आजोबाच्या हातात एक फूल देते. शेवटी फळांच्या गाडाजवळ आजोबा उभे दिसतात. हे आजोबा फळ विक्रेता आहेत.

हा संवाद ऐकून कोणीही थक्क होईल. काही लोकांना त्यांचे जुने दिवस आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

_.soulshine या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कधीही वेगळे न होणारे बंध.
काही बंध वेळेसोबत किंवा आयुष्यासोबत संपत नाहीत. जेव्हा प्रेम खरे असते तेव्हा ते आत्म्याचा अविभाज्य व शाश्वत भाग बनते. ते नेहमी आठवणींमध्ये, क्षणांमध्ये, हृदयाच्या शांत कोपऱ्यात नेहमी जिवंत राहते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रेमापेक्षा श्रेष्ठ जगात काहीही नाही” तर एका युजरने लिहिलेय, “पुरुष जेव्हा प्रेमात पडतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “हल्ली असं प्रेम दिसणे खूप कमी झाले आहेत.” एक युजर लिहितो, “निस्वार्थ प्रेम याला म्हणतात.” तर एक युजर लिहितो, “लक्ष्मीला लक्ष्मीजवळ ठेवले आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.