Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे. येथील ऐतिहासिक ठिकाणे, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे या शहराचा इतिहास सांगतात. पुण्यात आणि पुण्याजवळ असे अनेक सुंदर ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी प्रत्येकाने भेट द्यायला पाहिजे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी पुण्यापासून अगदी ३० किमी अंतरावर असलेल्या एका सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. अशात उन्हाळ्यात उन्हापासून प्रत्येक जण स्वत:ला वाचवतो आणि घराबाहेर पडणे टाळतो पण उन्हाळ्यात फिरायला जायचं असेल तर नेमके कुठे जावे, हा प्रश्न सुद्धा पडतो. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्याजवळच्या सुंदर ठिकाणाविषयी सांगितले आहे.

पुण्यापासून फक्त ३० किमी अंतरावर आहे हे सुंदर ठिकाण

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर तलाव दिसेल. या तलावाच्या काठी एक तरुणी बसलेली आहे आणि तलावाचे नयनरम्य दृश्याचा आनंद घेत आहे. पुढे व्हिडीओत खूप सुंदर सूर्यास्त दिसत आहे. या तलावाचे सभोवतालचे दृष्य अतिशय निसर्गरम्य आहे. तिथए प्रचंड शांतता आहे. उन्हाळ्यात अशा ठिकाणी वन डे ट्रिपला जाणे आल्हाददायक ठरू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ठिकाण नेमके आहे तरी कुठे? तर हे ठिकाण पुण्यापासून ३० किमी अंतरावर आहे. व्हिडीओवर लिहिलेय, “पुणेकरांनो, उन्हाळ्यासाठी हा व्हिडीओ नक्की सेव्ह करून ठेवा”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

ak_shata2003 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यापासुण ३० km असलेले सुंदर ठिकाण. मुळशी लेक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुळशी धरण”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. या धरणाचे सौंदर्य अप्रतिम आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले हे ठिकाण अतिशय सुंदर असून निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव मिळतो.