Viral Video : प्रेम हे केवळ एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नसते तर एखाद्या वस्तुविषयी व्यक्तीचे प्रेम दिसून येते. मोबाईल फोन, घडी, पेन अगदी रोज वापरणारी गाडी या गोष्टी माणसाला अतिशय प्रिय असू शकतात. काही लोकांचे त्या आवडत्या वस्तूवर एवढे प्रेम असते की ते त्या वस्तूशिवाय राहू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या तरुणाचे त्याच्या गाडीवर किती प्रेम आहे, हे दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ एका आरजे सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक अत्यंत खराब अवस्थेत असलेली स्कुटर दाखवते आणि तिच्या मित्राला विचारते, “काय त्या गाडीची अवस्था आहे बघितलं का? कोण घेऊन गेलं होतं या गाडीला?” त्यावर तिचा मित्र म्हणतो, “भंगारवाला” आणि तिचा मित्र हा किस्सा सांगतो, “आपण बेनीच्या घरी गेलो. तिच्या घरून आम्ही सकाळी परत आलो. मी परत सरळ घरी गेलो. मला सिद्धूने घरी सोडलं. मग मी रात्री निरंजन कडे आलो गाडी घ्यायला. निरंजन मला फोन करून म्हणतो, तुझी गाडी खाली नाही. निरंजन पुढे चौकात गेला तर भंगारवाला घेऊन जात होता”
आरजे सोनाली त्याला विचारते, “काय म्हणून सोडवून आणली गाडी? काय पुरावा आहे की ही गाडी तुझी आहे?” त्यावर मित्र म्हणतो, “पाठीमागे नंबर आहे की” शोनाली म्हणते, “नको रे.. किती आयुष्य वापरणार आहे तिचं.. गाडीवरचं प्रेम बघा”
त्यानंतर तिचा मित्र तिला गाडीवर बसवून घेऊन जाताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या जुन्या गाडीची आठवण येईल. गाडीवरील प्रेम काय असतं, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
rjshonali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आहे का तुमचा कोणी असा मित्र? ज्याचं तिच्यावर असं प्रेम आहे. सांगा तुमच्या सायकल,बाईक, कार वरील प्रेमाबद्दल नक्की!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा गाडी जुनी असो किंवा नवी, प्रेम असतं ते आपलं” तर एका युजरने लिहिलेय,”माझी तर भंगारवाला पण नेणार नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताईसाहेब हे गाडीवरचा प्रेम तुम्ही नाही समजू शकणार. माझ्याकडे APPACHE 160 4v नवीन मॉडेल असूनही .. मला मात्र 2008 चा मॉडेल APPACHE 160 RTR च आवडते..” एक युजर लिहितो, “भावाने स्वतःच्या कमाईतून घेतली असेल म्हणून खूप प्रेम करतोय गाडीवर.. पण थोडी रिपेअर तर कर म्हणावं भावा” तर एक युजर लिहितो, “हा पुण्याचा आहे वाटतं” तर एक युजर लिहितो, “पहिली गाडी पहिलं प्रेम”