Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स इतके सुंदर व अप्रतिम असतात की पुन्हा पुन्हा ते व्हिडीओ पाहावे वाटतात. काही डान्स व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील विविध कार्यक्रमातील डान्स व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मंडळी अप्रतिम असा डान्स सादर करत आहे. या व्हायरल व्हिडीओ मध्ये तुम्हाला चार तरुण दिसेल जे डोक्यावर ओढणी घेत सुंदर असा डान्स करताना आहे. मुलींनाही मागे पाडेल असा जबरदस्त डान्स या तरुणांनी केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
तरुणांनी माधुरी दीक्षितला टाकले मागे!
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसमारंभाच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चार तरुण डान्स करत आहे आणि नातेवाईक मित्रमंडळ त्यांचा डान्स बघत आहे. हे तरुण चोली के पीछे क्या है या लोकप्रिय हिन्दी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांनी अंगावर ओढणी घेतली आहे आणि ओढणीचा वापर करत ते झकास असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही अवाक् होईल. त्यांच्या प्रत्येक डान्स स्टेप्सवर लोक तेथील जमलेले नातेवाईल त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. या चार तरुणांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ ( Watch Viral Video)
mheshbelkr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलं पण काही कमी नाही मुलींपेक्षा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लय भारी” तर एका युजरने लिहिलेय, “वाह काय डान्स केला राव” आणखी एका युजरने लिहिलेय, “या तरुणांनी तर माधुरी दीक्षितला मागे टाकले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. सोशल मीडियावर तरुणांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ या पूर्वी सुद्धा व्हायरल झाले आहे पण हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.