Viral Video : हॉस्टेल हा काही लोकांच्या आयु्ष्यातील एक कठीण टप्पा असतो. घरापासून दूर शिक्षणासाठी जेव्हा एखाद्या हॉस्टेलला राहावं लागतं, तेव्हा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नवीन लोकांशी जुळवून घेणे, घरचे जेवण न मिळणे, आईवडील किंवा कुटुंबापासून दूर राहणे, इत्यादी गोष्टीला सामोरे जावे लागते. आपल्यापैकी अनेक जण हॉस्टेला राहिले असतील. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हॉस्टेलमधील आयुष्य दाखवलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ एका हॉस्टेलमधील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला काही चिमुकले दिसतील. ते फोनवर बोलत आहे. ते त्यांच्या कुटुंबातील लोकांबरोबर फोनवर बोलताना भावुक झालेले दिसत आहे. काही जण रडताना दिसत आहे. या चिमुकल्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून तुम्हाला कळेल की हॉस्टेलला राहणं वाटतं तितकं सोपं नसतं. शिक्षणासाठी घरच्यांपासून दूर राहणं खूप अवघड आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हॉस्टेलला राहणं वाटतं तितकं सोपं नसतं!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही तर आपल्या आयुष्याची खरी सुरुवात आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “बाळांनो आता थोडं वाईट वाटतं. आई वडील यांची आठवण येते पण तरी नाही रडता शिका. कारण पुन्हा येणाऱ्या काळात कधी रडायची वेळ येणार नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “घरीच नीट अभ्यास केला तर कोणते आई वडिल मुर्ख नाहीत हॉस्टेल ला टाकायला” एक युजर लिहितो, “मी पण होतो हॉस्टेलवर आई ला कॉल केल्यावर आई चा आवाज ऐकू आल्यावर डोळ्यात पाणी यायचं आवाज फुटत नव्हता” तर एका युजर लिहितो, “बालपण हरवून काय कमवायचे आयुष्यात. पुढचा काळ कोणाला माहित आहे?” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर भावुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांच्या हॉस्टेल जीवनाचे किस्से सांगितले आहे.