Viral Video : मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते.लहानग्यांची मैत्री तर अत्यंत निरागस आणि निखळ असते. सोशल मीडियावर चिमुकल्यांच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क रणार असतात सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला भर रस्त्यावर सायकलवर बसून रडताना दिसतो. पण पुढे त्याचा एक मित्र तिथे येतो आणि त्याला रडताना पाहून असं काही करतो की पाहून तुम्हीही भावुक व्हाल. मैत्रीतील प्रेम आणि जिव्हाळा दर्शवणारा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला सायकल थांबवून रस्त्यावर रडताना दिसत आहे. तो का रडतोय, हे माहीत नाही पण त्याचं रडणं बघून एक दुसरा चिमुकला सायकल चालवत तेथे येतो आणि त्याच्याजवळ सायकल थांबवतो. त्यानंतर हा पुढे येत त्याच्याजवळ जातो आणि अत्यंत मायेने आणि काळजीने त्याचे अश्रू पुसतो. त्यानंतर रडणारा मित्र त्याचा हात पकडतो आणि त्याच्या टी शर्टने डोळे पुसतो. हा व्हिडीओ इतका भावनिक आहे, की तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात नकळत पाणी येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
david_ford_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मैत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर सुरक्षित वाटण्याचा अवर्णनीय कम्फर्ट असतो” हा व्हिडीओ चार लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “भावा हे खूप सुंदर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा चिमुकला खरंच नशीबवान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “यापेक्षा मोठं सुख कोणतं असावं” एक युजर लिहितो, “जर तुम्हाला संधी मिळाली तर लोकांबरोबर मायेने वागा” तर एक युजर लिहितो, “आपल्या सर्वांना फक्त असे मित्र पाहिजे” आणखी एक युजर लिहितो, “हा व्हिडीओ जितक्या वेळा पाहिला तितक्या वेळा डोळ्यात पाणी आले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.