Viral Video : महाराष्ट्रातील लोणावळ्यापासून जवळपास २० किमीवर असणारा कोरीगड किल्ल्यावर दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक गर्दी करतात. या किल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. हा किल्ला जितका आकर्षक आहे पावसाळ्यात तितक्याच आकर्षक या किल्ल्याच्या पायऱ्या ठरतात कारण या पायऱ्यांवरून तलावातून साचलेले पाणी खाली ओसरताना पायऱ्यांवरून धबधब्याप्रमाणे वाहताना दिसते. सोशल मीडियावर या पायऱ्यांवरील मनमोहक दृश्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोरीगडच्या पायऱ्यांवरून वाहणारा धबधबा दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून या ठिकाणी भेट द्यावीशी वाटेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये कोरीगड किल्ल्याच्या पायऱ्यांवरून ओघळणाऱ्या पाण्याचे मनमोहक सुंदर दृश्य दिसत आहे. पायऱ्यावरून वाहणारे पाणी त्यात पावसाच्या सरी यापासून तयार झालेला हा सुंदर धबधबा पाहमून मन प्रसन्न होते. हे झरझर वाहणारं पाणी आजुबाजूनला हिरवा निसर्ग, हे दृश्य डोळ्यांना सुखावणारं आहे.
कोरीगड किल्ल्याच्या माथ्यावर दोन लहान तलाव आहेत. पावसाळ्यात या तलावांमधील पाणी ओव्हर फ्लो होतं, तेव्हा ते किल्ल्याच्या उतारावरून म्हणजेच पायऱ्यांवरून खाली वाहायला लागतं. पायऱ्या दगडी असल्याने पाणी झरझर खाली वाहतं आणि धबधब्यासारखं दृश्य निर्माण होतं. हे नैसर्गिक सौंदर्य पाहून कोणीही थक्क होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

punyachya_vatevar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोरीगडाच्या पायऱ्यावरून वाहणारं पाण्याचं मनमोहक रूप” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी मागच्या पावसाळ्यात असंच काहीतरी अनुभवलं” तर एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त….. भारीच आहे मी जाऊन आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी गेलीय खुप छान आहे खूप मज्जा येते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.