सोशल मीडिया म्हटलं रोज काही ना काहीतरी नविन पाहायला मिळतं. कुणी मजेशीर व्हिडिओ शेअर करतं, तर कुणी लोकांना आश्चर्यचकीत वाटेल अशी कृती करतं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ हा नित्याचाच भाग झाला आहे. नेटकरी कधी कोणता व्हिडिओ डोक्यावर घेतील सांगता येत नाही. आता असाच एका व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. करोना काळात वापरात असलेल्या मास्कचा यासाठी उपयोग करण्यात आला आहे. पॅराशूट मास्कचा हा व्हिडिओ एकदा दोनदा पाहिल्यानंतर खरं वास्तव समोर येतं. बनाव समजल्यानंतर चेहऱ्यावर हसू येतं, हे मात्र नक्की.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा फ्रेममध्ये बसलेला दिसत आहे. त्याने त्याच्या समोर २ विटा ठेवल्या आहेत. या दोन्ही विटांवर मास्कचं पॅराशूट बनवून त्याला आगपेटीचा बेस दिला आहे. तसेच त्याची बांधणी असी केली आहे की, पॅराशूटसारखं हवेत उडेल. तसेच मधोमध एक आगकाडी ठेवून पेटवली जाते. जसं काडीला आग लावली जाते तसं एअर बलूनसारखा मास्क हवेत उडू लागतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं कसं होत असेल हे पाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केला असेल, यात शंका नाही. मात्र बहुतांश नेटकऱ्यांच्या हा बनाव लक्षात आला आहे. त्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून प्रयोग करणाऱ्यांना वास्तव सांगितलं आहे. मास्क एका धागाच्या सहाय्याने वरती उचलल्याचं समजत आहे. कारण या प्रयोगाने मास्क वर उडू शकत नाही.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडिओ वास्तव समजण्यासाठी वारंवार पाहत आहेत. तर अनेक जण लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ युट्यूबवर पाहिला आहे. अनेक जणांनी इतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.