संध्याकाळी आपल्या कामातून थोडा वेळ काढून मित्रांना आपण भेटायला जातो. त्यांच्याबरोबर काहीतरी खाण्यासाठी आपण एखादे हॉटेल, कॅफे किंवा अगदी काहीच नाही तर नाक्यावरच्या चाटवाल्याकडे, मोमोच्या दुकानावर जातो. गरमागरम स्टीम मोमो, लाल चटणी आणि त्याबरोबर पेप्सी किंवा एखादे सॉफ्ट ड्रिंक यावर मित्रांच्या भरपूर गप्पा रंगतात.

मात्र, तुम्हाला जर कुणी पेप्सी आणि मोमो वेगवेगळे देण्याऐवजी, पेप्सीवर वाफवलेले मोमो खायला दिले तर? ऐकूनच अंगावर शहारा आला ना? पण असा प्रकार खरंच विकला जातो. सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @hnvstreetfood नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या ‘पेप्सी मोमो’चा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेमके या व्हिडीओमध्ये काय दाखवले आहे ते पाहू.

Breakfast Recipe
Marathwada Sushila Recipe : नाश्त्यात बनवा मराठवाड्याचा लोकप्रिय पदार्थ ‘सुशीला’, चुरमुऱ्यांपासून झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
mushrooms converted to vitamin D2 upon exposure to UV light from the sun before consuming them Read what Expert Said
खाण्यापूर्वी एक ते दोन तास ठेवा मशरूमला सूर्यप्रकाशात; व्हिटॅमिन डीची कमतरता राहील दूर? तज्ज्ञांनी सांगितलेलं सूत्र समजून घ्या
Kedarnath viral video
“काय रे केदारनाथला दारू प्यायला आलात?” गोंधळ घालणाऱ्या तरुणांना चांगलंच खडसावलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
drinking tea or coffee before or after meals may suggests ideal amount of caffeine to be consumed daily for proper digestion
तुम्हीसुद्धा ‘या’ वेळेत चहा-कॉफीचे सेवन करता का? थांबा! तज्ज्ञांकडून फायदे, तोटे नक्की जाणून घ्या
Desi Ghee vs Butter What is Better Simple Chart of fats calories
तूप खावं की बटर? दोन्हीच्या पोषणाची आकडे सांगणारा ‘हा’ तक्ता पाहा, तूप कसं बनवायचं व का खायचं याचं उत्तरही वाचा
Nachni papad recipe
उडीद आणि तांदळाचे नाही, यंदा बनवा उन्हाळा स्पेशल ‘नाचणीचे पापड’; लिहून घ्या साहित्य आणि कृती
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : वाह! WWE सुपरस्टार ‘जॉन सिना’ गातोय शाहरुख खानचे ‘हे’ गाणे! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात, “खूपच विचित्र…”

मोमो स्टीम म्हणजे वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी घातले जाते. परंतु, व्हिडीओच्या सुरुवातीला मोमो बनवणारी व्यक्ती पाण्याऐवजी स्टीमरमध्ये चक्क पेप्सी घालत असल्याचे आपल्याला दिसते. हे बघून खरंतर व्हिडीओ बनवणारा व्यक्तीदेखील आश्चर्यचकित झाला होता. म्हणून त्याने मोमो बनवणाऱ्या व्यक्तीला, तो “हे काय करतो आहे?” असा प्रश्न विचारतो. त्यावर समोरची व्यक्ती, “हे मला मालकाने करायला सांगितले आहे”, असे उत्तर देतो. पेप्सी वापरल्याने मोमोचा रंगदेखील बदलला असल्याचे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो. पेप्सीमुळे तयार झालेल्या मोमोजवर हलका काळपट किंवा ग्रे रंग आलेला आहे. तसेच या सॉफ्ट ड्रिंकचे काही थेंबदेखील त्यावर आपण पाहू शकतो.

आता अशा या पेप्सीमध्ये तयार केलेल्या मोमोची चव कशी लागेल याचा विचार तुम्हीच करा. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहू.

“पेप्सी ऐवजी यात अल्कोहोल घालून पाहा”, असे एकाने बदामाच्या डोळ्याचे इमोजी टाकत लिहिले आहे. दुसऱ्याने, “हा बावळटपणा फक्त इथेच होऊ शकतो” असे म्हटले आहे. तिसऱ्याने, “हे डीह्युमिडीफायर [dehumidifier] सारखे दिसत आहे” असे लिहिले आहे. तर शेवटी चौथ्याने “हे म्हणजे विषारी/जहरीले मोमोज” अशा आशयाची प्रतिक्रिया लिहिली आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली वेगवेगळ्या इमोजी आणि gif टाकून आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हेही वाचा : तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”

पेप्सी मोमोचा व्हिडीओ पाहा :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्याला आत्तापर्यंत ७८.४K व्ह्यूज मिळाले आहे.