Viral Video : गेल्या काही दिवसापासून पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यात पाऊस पडला लोकांची तारांबळ उडते. रस्तावर पाणी नद्यांप्रमाणे ओसंडून वाहताना दिसते. नदी नाल्यांना पूर येतो. गेल्या काही दिवसात अशीच परिस्थिती पुण्यात दिसून आली. पुण्यातील हिंजेवाडी परिसरात तर पावसाचा हाहाकार दिसून आला. सोशल मीडियावर हिंजेवाडी परिसरातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन पीएमटी बस दिसेल. ज्या भर पावसात नद्यांप्रमाणे वाहणाऱ्या रस्त्यावरील पाण्यातून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओमध्ये पीएमटी बसचालकांचा बेशिस्तपणा दिसत आहे. प्रवाशांसह बसचालक जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून पीएमटी बसचालकाने चालवली बस
हा व्हायरल व्हिडीओ हिंजेवाडी मार्गावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रस्त्यावर खूप जास्त पाणी साचले आहे. रस्त्याने नदी नाल्याचे स्वरुप स्वीकारले आहे. अशा परिस्थितीत एवढ्या पाण्यातून पीएमटी बसचालक बस चालवताना दिसत आहे. अशा प्रकारे बस चालवणे हे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होईल, असे कृत्य आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक युजर्स संतापले आहेत. काही लोक प्रशासनाला दोष देताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ
grand_pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काय म्हणता पुणेकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पीएमटी ला पुण्याचा पाणी काढायला काम दिलं आहे का” तर एका युजरने लिहिलेय, “बसमधल्या लोकांना एअर बॅग द्या तेवढ्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “काही बेशिस्त पुणेकरांमुळे ही वेळ आलेली आहे बहुतांशी लोक कचरा रस्त्यावरच टाकत आहेत. ड्रेनेज नाले तुंबल्यावर आणखी काय होणार ?” एक युजर लिहितो, “ड्रायव्हर वर कारवाई झाली पाहिजे…. कारण ती बस इलेक्ट्रीक आहे जर पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाला असता तर विचार करा” तर एक युजर लिहितो, “ही पीएमटी अशा पाण्यात बंद पडली तर..”