Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास आणि येथील संस्कृतील या शहराची ओळख सांगतात. पण पुण्यातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येतात. तुम्ही पुणेरी पाट्यांविषयी ऐकलेच असेल पण हल्ली पुण्यात पाट्यांचा एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो. अनेक तरुण मंडळी हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभे असतात. त्या पाटीवर कधी मजेशीर तर कधी भावनिक तर कधी खोचक टोला लगावत टीका केली जाते. काही लोक गाड्यांच्या मागे सुद्धा अशाच पाट्या लावतात पण सध्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे कारण या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका दुचाकी चालक तरुणाने चक्क पाठीवर पाटी लटकवली आहे आणि त्यावर मेसेज लिहिला आहे तसेच त्याने त्याच्या हेल्मेटच्या मागील बाजूवर सुद्धा मेसेज लिहिला आहे. त्याने काय मेसेज लिहिलेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
पुण्यातील तरुणाची पाटी होतेय व्हायरल
हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील ट्रॅफिकमधला आहे. तुम्हाला या ट्रॅफिकमध्ये एका दुचाकी चालक तरुण दिसेल ज्याने त्याच्या पाठीवर पाटी लटकवली आहे. त्या पाटीवर त्याने लिहिलेय, “कर्ज पाहिजे…! रस्त्यावरील खड्डे बुजवायला” तसेच त्याने त्याच्या हेल्मेटवर सुद्धा आणखी एक मेसेज लिहिला आहे, “मर महागड्या गाडीला ओळखत नाही म्हणून.. नियम पाळा” ‘ ट्रॅफिकमधील लोक ही पाटी वाचताना दिसत आहे. त्यातील एकानेच हा व्हिडीओ शूट केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “MH14 – पुणेकर” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच गरज आहे कर्जाची” आणखी एका युजरने लिहिलेय, “खेड शिवापूर टोल नाक्यावर खड्ड्यातून गाडी चालवतात अन् लोक टोल भरत आहेत” एक युजर लिहितो, “आधी ट्रफिक कमी करा” तर एक युजर लिहितो, “सलाम या भावाला” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून प्रशासनावर टीका केली आहे. पुण्यात यापूर्वी सु्द्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. अशा व्हिडीओवर सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देतात.