Shiv Thakare Video : रिअ‍ॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळवणारा मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे आणि त्याच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक व्हिडीओ शेअर करतो. तो त्याच्या आज्जीबरोबरचे व्हिडीओ सुद्धा शेअर करतो. या व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आज्जीच्या केसांची वेणी घालताना, कानातले घालताना, तिच्या बरोबर मंदिरात जाताना दिसतो. आज्जीबरोबर घालवलेले हे खास क्षण पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला शिव त्याच्या आज्जीच्या केसांची वेणी घालताना दिसतो आणि आज्जी बरोबर गप्पा मारताना सुद्धा दिसतो. त्यानंतर तो आज्जीला कानातले घालताना दिसतो आणि कानातले घातल्यानंतर आज्जीला आरशात बघायला सांगतो. त्यानंतर आज्जीच्या कुशीत झोपताना सुद्धा दिसतो. आज्जी प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्याच्याशी बोलताना दिसते. पुढे व्हिडीओत आज्जी आणि शिव पाळण्यावर बसून मोबाईल बघत असतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी तो आज्जीला घेऊन मंदिरात जातो आणि देवीचे दर्शन घेतो. आज्जीबरोबर घालवलेले खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

shivthakare9 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिन को रात कहेगी तो मैं रात कहूं, तेरा दिल दुखा दे जो ऐसी न बात करूं”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजी नातू प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “कोणाची नजर लागू नये” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुझ्या सारखा नातू, मुलगा प्रत्येकाला मिळो” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोड!! मी पण माझ्या म्हातारपणी अशीच नातवाकडून वेणी फणी करून घेणार” एक युजर लिहितो, “आज्जीच्या चेहऱ्यावरील आनंद बघा” तर एक युजर लिहितो, “शिव अंबाआईचे पण दर्शन घडवले तू आम्हाला” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.