scorecardresearch

चार थरांची दहीहंडी आणि KGF चं पार्श्वसंगीत, आदित्य ठाकरेंच्या अनोख्या स्वागताचा Video चर्चेत

शिवसैनिकांनी शिवसंवाद यात्रेत चार थरांची दहीहंडी रचून आदित्य ठाकरेंना अनोख्या पद्धतीने पाठिंबा दिलाय.

Aaditya Thackeray Shivsanvad Yatra V
शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंचं अनोखं स्वागत

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरू केलीय. ते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांशी बोलत आहेत. यावेळी त्यांच्याकडून बंडखोर शिवसेना आमदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत होतंय. अशाचप्रकारे जोरदार स्वागताचा आणि त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओत शिवसैनिकांनी चार थरांची दहीहंडी रचून आदित्य ठाकरेंना अनोख्या पद्धतीने आपला पाठिंबा दिलाय. या व्हिडीओत प्रसिद्ध केजीएफ चित्रपटातील गाणंही वापरण्यात आलंय.

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आदित्य ठाकरेंच्या स्वागताचा एक व्हिडीओ शेअर केला जातोय. त्यात आदित्य ठाकरे आपल्या गाडीतून शिवसैनिकांमधून जात आहेत. त्यावेळी शिवसैनिकांनी चार थरांची दहीहंडी रचलेली दिसत आहे. सर्वात वरच्या थरातील शिवसैनिकांने आपल्या हातात आदित्य ठाकरेंना पाठिंबा देणारं पोस्टर हातात घेतलेलं दिसत आहे.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “मी आधी बोललो नाही, पण आज मुलगा म्हणून बोलतोय, गद्दारांनी…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

शिवसैनिकांनी चार थरांची दहीहंडी रचून पाठिंबा दिल्यानंतर आदित्य ठाकरे देखील गाडीतून या शिवसैनिकांना दोन्ही हात जोडून अभिवादन करतात. तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षावर करतात. या व्हिडीओ पोस्टवर अनेक शिवसैनिक कमेंट करून आदित्य ठाकरेंचं कौतुकही करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of shivsena worker supporting aaditya thackeray through four level human pyramid pbs

ताज्या बातम्या