ICC Women’s World Cup 2022: भारत आणि पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यातील महिला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपली ताकद दाखवून दिली आहे. सुरुवातीला भारतीय संघ थोडा सावध खेळ करत होता पण नंतर पूजा आणि स्नेह राणा यांच्यातील विक्रमी भागीदारीमुळे या सामन्यात भारताचे पुनरागमन झाले. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय. भारताची सलामीवीर स्टार फलंदाज स्मृती मानधना हिच्या फलंदाजीचे सर्वांनाच वेड लागले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अर्धशतकी खेळीत तिने असा षटकार ठोकला की पाकिस्तानचे खेळाडू फक्त बघतच राहिले.

हा षटकार स्मृतीने दहाव्या षटकात मारला. याआधीही मंधानाने असाच फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो चेंडू सीमारेषेवर पडला, त्यानंतर मंधाने पुन्हा इन-साइड-आउट शॉट खेळला आणि यावेळी या शॉटमध्ये इतकी ताकद होती की चेंडू थेट सीमारेषेच्या दोरीच्या बाहेर गेला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

(हे ही वाचा: IND Vs PAK: मिताली राजने केली सचिनसोबत बरोबरी; रचला विश्वचषकाचा ‘हा’ अनोखा विक्रम)

(हे ही वाचा: Viral Photo:…तोपर्यंत लग्न करणार नाही, विराटसाठी चाहत्याने घेतला मोठा निर्णय)

सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानी गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी केली. भारताकडून शेफाली वर्मा शून्य धावांवर बाद झाली, मात्र त्यानंतर स्मृती मानधनाने चांगली आघाडी घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. महिला विश्वचषकाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शॉटचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाचा चेहरा कसा झाला हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.