Viral Video : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. आयुष्यात चांगले मित्र असणे आवश्यक आहे. हे मित्र आपल्याला कधी मनभरून आनंद देतात तर कधी न मागता आधार देतात. चांगल्या किंवा वाईट क्षणी ते नेहमी आपल्या बरोबर कायम उभे राहतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अशाच काही मित्रांनी एका तरुणाचा जीव वाचवला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पुल दिसेल या पूर आल्याने पुलाखाली पाणी ओसंडून वाहत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की तीन मित्र धावत पुलाच्या एका बाजूला येतात. त्यातील दोन मित्र तिसऱ्या मित्राला पुलावरून उलट दिशेने लटकवतात आणि त्याचे दोन्ही पाय धरतात. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे नेमकं काय करताहेत? पण तितक्यात पुलाखालून एक तरुण वाहत येताना दिसतो. उटल दिशेने लटकवलेला तरुण त्याच्या हाताने पुलाखालून वाहत असणाऱ्या तरुणाला पकडतो. पण पाण्याचा फ्लो इतका असतो की तो पुन्हा वाहत जाईल याची भीती असते पण तितक्यात त्याच पूलावरून जाणारा एक दुचाकी चालक तरुण गाडीवरून उतरतो आणि पुला शेजारी असलेल्या दगडावर उडी मारतो आणि त्याची मदत करतो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हे मित्र त्या तरुणाचे मित्र आहेत का, याविषयी माहिती नाही. पण त्या तीन मित्रांनी दाखवलेल्या हिंमतीमुळे त्या तरुणाचा जीव वाचू शकला.
त्या तीन मित्रांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि एकमेकांना साथ देण्याचे धैर्य या व्हिडीओतून दिसून आले.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
_sad_video__06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “टायमिंग जबरदस्त” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात जिवलग मित्र” आणखी एका युजरने लिहिलेय, “सलाम तुमच्या मैत्रीला” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या मित्रांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.