video of wife singing to 70 yr old husband in hospital leaves netizens in tears watch | Loksatta

प्रेम कधीच म्हातारे होत नाही! थरथरत्या हातांनी पतीचा हात धरत तिने गायले गाणे….रुग्णालयातील हृदयस्पर्शी व्हिडिओ एकदा पाहाच

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध पत्नीने आपल्या आजारी वृद्ध पतीसाठी गाणे गायले आहे.

प्रेम कधीच म्हातारे होत नाही! थरथरत्या हातांनी पतीचा हात धरत तिने गायले गाणे….रुग्णालयातील हृदयस्पर्शी व्हिडिओ एकदा पाहाच
photo(social media)

प्रेम सर्वजण करतात. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम जपण्याचे आणि सोबत राहण्याचे वचन फार कमी लोक पाळतात. ज्या लोकांनी हे वचन पाळलंय त्यांचे प्रेम नेहमीच इतरांसाठी एक उदाहरण बनले आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका वृद्ध पत्नीने आपल्या आजारी वृद्ध पतीसाठी गाणे गायले आहे. तिने गायलेले गाणे ऐकून तिचे तिच्या नवऱ्याप्रती असणारे प्रेम पाहून हृदय भरून येईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतातील नाही, पण प्रेमाला कोणत्याही भाषेची गरज नाही असं म्हणतात ना,कदाचित त्यामुळेच स्पेनचा हा व्हिडिओ जगभरात प्रेमाचा संदेश देत आहे.

गुडन्यूज_मूव्हमेंट अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये “हमेशा के लिए असे लिहिले आहे. ७० वर्षांची पत्नी पतीची सेवा करते, असेही यात देण्यात आले आहे. तब्बल ७० दिवसांनंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने ती हे गाणे गात आहे.

( हे ही वाचा: भुकेलेल्या सिंहाच्या कळपामध्ये अडकली बिचारी म्हैस; पुढे असं काही घडलं की…Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक वृद्ध व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून असल्याचे दिसत आहे. तर वृद्ध स्त्री म्हणजेच त्याची पत्नी त्याचा हात धरून त्याच्यासाठी गाणे म्हणत आहे आणि आपल्या पतीचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा ती म्हातारी गात असते. तेव्हा तिचा नवरा थरथरत्या हातांनी तिच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श करताना दिसतो. हा व्हिडिओ खूपच भावूक आहे.

नवऱ्यासाठी गाणे गाणाऱ्या वृद्ध पत्नीचा व्हिडिओ येथे पाहा

( हे ही वाचा: Baba Vanga: नवीन युगातील बाबा वेंगा बनली ‘ही’ १९ वर्षीय युवती; २०२२ मध्ये तिने केलेल्या ‘या’ भविष्यवाण्या ठरल्यात खऱ्या)

हा भावूक व्हिडिओ आतापर्यंत २ लाख ४० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अनेक यूजर्स सुंदर कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडिओ बॉलीवूड अभिनेत्री कोंकणा सेन आणि अनुष्का शर्मालाही आवडला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, हे खूप भावूक आहे. आणखी एका युजरने ‘खरे प्रेम’ लिहिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हुबेहूब स्कॉच ब्राइटसारखा दिसणारा केक तुम्ही पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

संबंधित बातम्या

Most Wanted आरोपींच्या यादीत नाव नसल्याचं आरोपीनेच FB वर कमेंट करुन सांगितलं; पोलिसांनी आधी Reply केला अन् नंतर…
इमारतीच्या छतावर विटा नेण्यासाठी कामगारांनी शोधली भन्नाट आयडीया; नेटकरी म्हणाले, ‘क्रिएटीव्हीटीला सलाम’
जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या, “सोलापूरमधील एका…”
कर्म तैसे फळ! रस्त्याने निघालेल्या म्हशीला लाथ घातली आणि करुन घेतली स्वत:ची फजिती
Destroyed Sneakers: ‘उद्ध्वस्त बुटां’ची किंमत दीड लाख; कंपनीने केलेलं वर्णन पाहून अनेकजण म्हणाले, “यापेक्षा ५००-७०० चे घ्या अन्…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : पर्यावरणासाठी केली जात आहेत टायर्स पंक्चर, जगभरात सुरू आहे आंदोलन, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या
‘मविआ’चा १७ डिसेंबरला महामोर्चा; राज्यपाल, सीमाप्रश्नाबाबत आक्रमक भूमिका
राज्यात लवकरच नवे उद्योग धोरण- फडणवीस
महिलांची ‘आयपीएल’ स्पर्धा महत्त्वाची -हरमनप्रीत कौर
FIFA World Cup 2022: पोर्तुगालसमोर स्विर्त्झंलडचे आव्हान