Viral Video : सोशल मीडियावर अनेक जुने नवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. असाच एक पोट धरून हसवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक योग शिकवणारी महिला ट्रेनर चक्क योग शिकवता शिकवता झोपी गेली. पुढे काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
हा व्हायरल व्हिडीओ ‘योगा दिवस’ चा आहे. व्हिडीओत तुम्हाला स्टेजवर दोन महिला ट्रेनर व एक पुरुष ट्रेनर योग शिकवताना दिसेल. त्यांच्यासमोर काही लोक बसलेले दिसत आहे. हे लोक योगा ट्रेनरला पाहून त्यांचे अनुकरण करत आहे. पुढे जे काही घडतं ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला स्टेजवरील तीन ट्रेनरपैकी एक महिलाट्रेनर स्लीप स्थितीत दिसेल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही महिला ट्रेनरने पाठीवर झोपून शरीर पूर्णपणे शिथिल केले आहे पण भरपूर वेळ होऊनही जेव्हा ट्रेनर उठत नाही तेव्हा सर्वांना शंका येते. शेजारचा पुरुष ट्रेनर स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या अँकरला स्मित हास्य करत खुणावतो की ही महिला ट्रेनर झोपलेली आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो पुरुष ट्रेनर आणि एक अँकर त्या झोपलेल्या ट्रेनरला उठवतात आणि त्यानंतर तीट्रेनर उठते. विशेष म्हणजे त्या ट्रेनरला सुद्धा हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहून कोणीही पोट धरून हसेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
rahulholkar11 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सकाळी लवकर उठून योगा शिकण्यासाठी गेलो
योगा शिकवणारीच झोपून गेली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ह्याला म्हणतात मन लावून काम करणे” तर एका युजरने लिहिलेय, “पहिले झोप मग योग” आणखी एका युजरन लिहिलेय, “निद्रासन मध्ये गेल्या आहेत मॅडम” एक युजर लिहितो, “याला झोपासन म्हणतात.. तास भर डिस्टर्ब नाही करायचं” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय काय बघावं लागतं” एक युजर तर लिहितो, “शवासन शिकवावं तर असं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.