Viral Video : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आईवडिल आणि मुलांचे एकमेकांवर प्रेम असो किंवा भाऊ बहिणीचे एकमेकांवर प्रेम असो, आजी आजोबा आणि नातवंडांचे एकमेकांवर प्रेम असो किंवा मित्र मैत्रीणीचे एकमेकांवर प्रेम असो; प्रत्येक प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. यात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकराचं प्रेम हे जगावेगळं असतं. दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. एकमेकांबरोबर कायम सोबत राहण्याचं वचन देतात, एकमेकांची आयुष्यभर साथ देतात. हे प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केले जाते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीविषयीचे प्रेम हटके अंदाजात व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका ट्रॅफिक सिग्नलवरील आहे. या व्हिडीओत तुम्हाला काही वाहने सिग्नलवर थांबलेले दिसेल. यामध्ये एका दुचाकीचालकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने एक हटके टी शर्ट घातले आहे. ही टी शर्ट पाहून कोणीही थक्क होईल. या टीशर्टच्या एका तरुणीचे सुंदर फोटो आहेत. त्याखाली माय गर्ल असे लिहिलेय, तर फोटोच्या अगदी वर यु आर माय हॅप्पी प्लेस असे लिहिलेय. या टीशर्टद्वारे त्याने प्रेयसीविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. प्रेम व्यक्त करण्याचा त्याचा हटके अंदाज पाहून कोणीही थक्क होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
callme_zabiii. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इतक्या वेड्या मुलासाठी मी सुद्धा पात्र आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत तर दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “जे तुमच्याजवळ आहे, त्याची किंमत ठेवा” तर एका युजरने लिहिलेय, “ती मुलगी किती नशीबवान असेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “देवा, माझ्याजवळही असाच पार्टनर असता तर..” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.