Viral Dance Video: तेलुगु ब्लॉकबस्टर पुष्पा – द राइज मधील अल्लू अर्जुनचे डायलॉग, रश्मिका मंदान्नाचा गोंडसपणा आणि समंथा अक्किनेकीचा बोल्ड डान्स हे सर्वकाही तुफान व्हायरल झाले होते. इतक्या महिन्यांनंतर अजूनही पुष्पाची फायर काही केल्या कमी होत नाही. चित्रपटाची क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पाहायला मिळाली होती आणि अजूनही अनेक डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. असाच एक व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये तीन तरुणी समंथाच्या oo antava गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहेत. लाल केशरी साडी नेसलेल्या तरुणींच्या मादक अदा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

आपण व्हिडीओ मध्ये पाहू शकता की, तीन तरुणी लाल रंगाच्या साडीत एका विवाह सोहळ्यात डान्स करताना दिसत आहेत. सुरुवातीला त्या उ अंटावा गाण्यावर आपल्या कमाल मूव्ह्ज दाखवतात. पुढे व्हिडीओ मध्ये कतरिनाच्या टिप टिप बरसा पानी २.० गाण्यावर या तरुणींच्या हॉट अदाकारी पाहायला मिळत आहेत.

(Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; इतक्यात एक चिमुकला आला अन..पाहा थरकाप उडवणारा क्षण)

या व्हिडिओची खास बाब म्हणजे या सुंदर तरुणींना समोरच्या प्रेक्षक महिला जोरदार प्रोत्साहन देत आहेत. आपण पाहू शकता अनेक महिला समोर मोबाईल घेऊन व्हिडीओ करत आहेत आणि सोबतच टाळ्या शिट्या वाजवून या डान्सर्सना दाद देत आहेत.

पहा तरुणींच्या सुंदर अदाकारी

बेली डान्स हा अरेबिक देशांमध्ये प्रसिद्ध असा एक नृत्याचा प्रकार आहे, मात्र साडी नेसून या भारतीय तरुणींनी या कलेला भारतीय तडका दिल्याचे दिसतेय. हा फ्युजन नृत्याविष्कार नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे.