अलाहाबादमध्ये एका दारुड्या महिलेची नशा उतरवण्यासाठी पोलिसांनी तिला चांगलाच चोप दिला. दारुच्या नशेत असलेली ही महिला भर रस्त्यात गोंधळ घालत होती. त्यामुळे तिच्या बाजूला लोकांची गर्दी जमली होती. हे लोक महिलेची मजा पाहात उभे असताना त्याठिकाणी येत पोलिसांनी तिची नशा उतरवली. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून महिला कशा पद्धतीने वर्तन करत आहे हे दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका दारुच्या दुकानासमोर एक महिला उभी होती. हे दुकान बंद असताना महिला त्याठिकाणी नशेत बोलत आणि विचित्र वर्तन करत उभी होती. तिला पाहण्यासाठी रस्त्यातील लोकांनी गर्दी केली असताना पोलिसांनी याठिकाणी येत महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाचेच काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेली ही महिला अतिशय असभ्य वर्तन करत असल्याचे दिसत आहे.

महिला असल्याने पोलिसांनी अखेर या महिलेला पोलिस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ही महिला मला दारु, सिगारेट द्या अशी मागणी करत होती. तरीही संबंधित महिला पोलिसांचे ऐकत नसल्याने या महिलेला अखेर पोलिसांनी चांगलाच चोप दिला. १०० क्रमांकावर आलेल्या फोनवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नशेत असलेल्या या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर तिच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video police officers beat a drunk woman allahabad
First published on: 22-06-2017 at 16:48 IST