Israeli PM Benjamin Netanyahu fact check video : इराणने इस्त्रायलवर १ ऑक्टोबर रोजी अभूतपूर्व हल्ला केला, इराणने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यापैकी हे हल्ले सर्वात मोठे होते. या हल्ल्यावेळी इस्त्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. याच घटनेदरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू धावताना दिसत आहेत. इराणने मिसाईल हल्ला करताच इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी बॉम्ब शेल्टरकडे धाव घेतल्याचा दावा या व्हिडीओसह करण्यात आला आहे. पण, खरंच अशाप्रकारे काही घडले का याचा तपास केला, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं ते नेमकं काय आहे, सविस्तर जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर सीरियन गर्लने तिच्या एक्स हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील समान दाव्यासह तोच समान व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

व्हिडीओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉट्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

आम्हाला २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये kikar.co.il या वेबसाइटवर व्हिडीओचा स्क्रीनशॉट सापडला.

https://www.kikar.co.il/political-news/407728

रिपोर्टमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : रात्रीच्या वेळी, शेवटी एका मताने मंजूर झालेल्या स्फोटक कायद्यावरील मतदानादरम्यान, विरोधी पक्षनेते बेंजामिन नेतान्याहू, जे नेसेट इमारतीतील त्यांच्या खोलीत थांबले होते, त्यांना सेमिटिक मतदानासाठी बोलावले यावेळी ते तेथे जाण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी नेसेट कॉरिडॉरमधून धावू लागले. (नेसेट ही इस्त्रायलची संसद आहे).

तेव्हाच आम्ही इंटरनेटवर व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी Google कीवर्ड सर्च केले.

यावेळी आम्हाला नेतान्याहू यांच्या X हँडलवर त्यांचा धावतानाचा एक मोठा व्हिडीओ सापडला.

व्हिडीओ १४ डिसेंबर २०२१ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

हेही वाचा – भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, लहान मुलाने आईच्या डोक्यात घातली बॅट; थरारक घटनेचा Video Viral

आम्हाला इतर मीडिया वेबसाइटवरदेखील व्हिडीओ सापडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.hidabroot.org/article/1162572

निष्कर्ष : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा जुना व्हिडीओ, ज्यात ते इस्त्रायलच्या संसदेत (नेसेटमध्ये ) धावताना दिसत आहेत, तो व्हिडीओ आता इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला त्या रात्रीचा असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. पण, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.