Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’, ‘कतल’, ‘बंबई की रानू’ अशी अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या ‘उई अम्मा’ हे गाणंही खूप चर्चेत आहे, ज्यावर सोशल मीडियावरील अनेक जण रील्स बनविताना दिसत आहेत. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.
सोशल मीडियावर अनेक चांगल्या-वाईट घटनांचे व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. हल्ली अनेक युजर्स सोशल मीडियावर उत्तम दर्जाचे कंटेंट शेअर करतात. त्यात ज्यात सुंदर डान्स, संगीत, रेसिपी, लेखन अशा विविध गोष्टी आपल्याला पाहायला किंवा वाचायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली ‘उई अम्मा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable_aanyaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास दशलक्षांहून व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “परी सारखी दिसतेय ही” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “काय नाचते ही यार”, तर तिसऱ्याने लिहिलेय, “खूप खूप निरागस” तर आणखी अनेक युजर्स चिमुकलीचे कौतुक करताना दिसत आहेत.