scorecardresearch

…आणि तो ठरला मित्रांचा अखेरचा संवाद! सहाव्या मजल्यावरून कोसळला तरुण, Video पाहून उडेल थरकाप

Student Dies In Kota Hostel Video: बाल्कनीच्या रेलिंगची जाळी तुटून तो त्यासह खाली कोसळल्याचे समजत आहे. त्यावेळी त्याच्या हातात..

Video Student Dies In Kota Hostel Falls From Sixth Floor After Loosing Control Balcony Railing Breaks Shocking Horrible Incident
बाल्कनीत गप्पा मारताना मृत्यू; सहाव्या माळ्यावरून थेट कोसळला, Video मध्ये पाहा नेमकं घडलं काय? (फोटो:ट्विटर)

Student Dies In Kota Hostel Video: राजस्थान मधील कोटा येथील हॉस्टेलमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचे समजत आहे. गुरुवारी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी एक तरुण आपल्या मित्रांसह घरच्या बाल्कनीत बसला असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.बाल्कनी मध्ये मित्रांच्या मस्तीमध्ये या तरुणाला आपला प्राण गमवावा लागल्याचे समजत आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार हा तरुण विद्यार्थी तोल गेल्याने सहाव्या माळ्यावरून खाली पडतो. बाल्कनीच्या रेलिंगची जाळी तुटून तो त्यासह खाली कोसळल्याचे समजत आहे.

डीएसपी अमर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव इशांशु भट्टाचार्य असे असून तो २० वर्षाचा होता. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पश्चिम बंगाल जलपाईगुड़ी येथील मूळ रहिवाशी असणारा इशांशु कोटा इथे आला होता. तो कोटाच्या जवाहर नगर भागात राहून नीटची तयारी करत होता. मृत तरुणाचे शवविच्छेदनासाठी भीमसिंह हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. वात्सल्य रेजीडेंसी होस्टेलच्या सहाव्या माळ्यावरून इशांशु खाली पडला.

डीएसपीच्या माहितीनुसार, सदर घटनेची माहिती मिळताच हॉस्टेलमधील अन्य विद्यार्थी सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. तात्काळ इशांशुला घटनास्थळावरून जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते पण त्यावेळी त्याला लगेचच मृत घोषित करण्यात आले. एवढ्या उंचीवरून पडल्यावर इशांशुचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता.

सहाव्या माळ्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यावर सदर घटना ही आत्महत्येचे प्रकरण नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इशांशु हा तोल गेल्याने बाल्कनीतून खाली कोसळला व म्हणूनच मृत्यू झाल्याचे समजत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 19:54 IST