Viral Video Today: सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अगदी प्राण्यांपासून ते रोबोटपर्यंत म्हणाल त्या पद्धतीच्या व्हिडीओची ऑनलाईन चर्चा रंगते. काही जण आपल्या कलेने तर काही जण हुशारीने लोकांना इम्प्रेस करतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर येतआहे . यामध्ये एका तरुणीची हुशारी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एखाद्या सिनेमाला शोभावा असा हा एक व्हिडीओ म्हणता येईल. व्हिडिओमध्ये एक चोर तरुणींकडून तिची पर्स चोरण्याचा प्रयत्न करत असतो पण व्हिडीओ शेवटी त्याच्याबरोबर जे घडतं ते बघून तुम्हीही या तरुणीच्या हुशारीची दाद द्याल.

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये बघू शकता की एक मुलगी रस्त्यातून चालत आहे इतक्यात एक तरुण स्कुटीवरून येतो व तरुणीच्या हातातील पर्स खेचून पळायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला तरुणी त्याच्याकडून पर्स खेचण्याचा प्रयत्न करते आणि मग बघते की त्याने त्याची स्कुटी तर चावी न काढताच चालू ठेवली आहे. हे बघून अचानक ती आपली बॅग स्वतःच जमिनीवर टाकते आणि स्कुटीच्या दिशेने धाव घेते. चोर सुद्धा हे बघून गोंधळतो आणि तो बागेच्या ऐवजी त्या तरुणीच्या मागे पळू लागतो. मग काही वेळ ते दोघे कबड्डी खेळतात तशी एकमेकांना हूल देत बॅग व स्कुटी च्या मधोमध पळापळ करतात. आणि मग शेवटी जे घडतं ते पाहून चोरही थक्क होतो.

Video: चोरावर UNO रिव्हर्स

हे ही वाचा<< ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचे ‘हे’ Video पाहून मराठी प्रेक्षक झाले प्रचंड आनंदी! म्हणतात, “तुझं बोलणं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहण्यावरून तरी स्क्रिप्टेड असावा असे वाटत आहे. पण खरोखरच कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग आला आणि चोरांनी तुमच्यावर हल्ला केला तर ही आयडिया नक्कीच भन्नाट पद्धतीने वापरली जाऊ शकते. यावर अनेकांनी कमेंट करत या तरुणीच्या हुशारीचे कौतुक केले आहे. तू शेर तर मी सव्वाशेर या म्हणीचा व्हिडीओ बनवला तर तो असादिसेल असेही काहींनी म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.