scorecardresearch

बिबट्याच्या हल्ल्याने वाघ पिसाळला, झेप घेतली तेवढ्यात वजन.. जंगलातील थरारक Video पाहून थक्कच व्हाल

Tiger And Leopard Viral Video: तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर शरीर योग्य आकारात असणे किती महत्त्वाचे आहे हे ही नंदा यांनी अधोरेखित केले आहे.

Video Tiger vs Leopard Attack Fat Tiger Pulled Down From Tree Due To Over Weight Shocking Clip Goes Viral
बिबट्याच्या हल्ल्याने वाघ पिसाळला, झेप घेतली तेवढ्यात वजन..(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Tiger And Leopard Viral Video: आपण सगळेच आपल्या घराच्या बाबत अगदी दक्ष असतो. अगदी नाक्यावरच्या दुकानात जायचं असेल तरी घराच्या दाराला लावलेलं कुलूप दोन वेळा तपासून पाहतो. माणसाचा उगम प्राण्यांपासून झाल्याचे म्हणतात म्हणूनच अर्थात माणसाच्या अनेक सवयी प्राण्यांमध्ये अधिक ठळक दिसून येतात. प्राणी स्वतःच्या घराची काळजी घेताना आपल्यापेक्षाही अधिक आक्रमक असतात, जर त्यांच्या घरावर हल्ला झाला तर समोर प्राणी असुदे, माणूस असुदे किंवा अगदी कुणीही येउदे त्याचा फडशा पडल्याशिवाय हे प्राणी थांबत नाहीत. सोशल मीडियावर प्राण्यांच्या घराच्या वादाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या वादापायी दोन बलाढय प्राणी एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले आहेत, वाघ व बिबट्याची थरारक लढाई या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

भारतीय वन्याधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओची आणखी एक खासियत म्हणजे वाघाचे वर्चस्व असलेल्या भागात बिबट्याने ज्या पद्धतीने आपला जीव वाचवला आहे ते खरोखरच बघण्यासारखे आहे. IFS अधिकारी सांगतात की, वाघ सहजपणे झाडांवर चढू शकतात, त्यांच्या तीक्ष्ण आणि मागे घेता येण्याजोग्या पंज्यांमुळे झाडाचे खोड पकडण्यासाठी आणि वर चढण्यासाठी मजबूत पकड मिळते. पण जसजसे ते वृद्ध होतात तसतसे त्यांच्या शरीराचे वजन त्यांना तसे करण्यास प्रतिबंध करते. यातून तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर शरीर योग्य आकारात असणे किती महत्त्वाचे आहे हे ही नंदा यांनी अधोरेखित केले आहे.

वाघ व बिबट्याची थरारक लढाई..

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘ती’ माईक व स्पीकर घेऊन चढली; प्रत्येक शब्दाला उंचावल्या प्रवाशांच्या भुवया, Video पाहा

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर हजारो व्ह्यूज व कमेंट्स आहेत. वाघ एखाद्या छोट्या प्राण्याला सहज उडवून लावू शकते पण समोर चित्त्यासारखा चपळ व अत्यंत ताकदवान प्राणी असतानाही वाघाची हिमंत व हुशारी पाहता सर्वच थक्क झाले आहेत. जंगल सफारीवर गेलेल्या काही पर्यटकांनी हा दुर्मीळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 10:17 IST