Unacademy Tutor Slammed: ई-लर्निंग प्लॅटफॉर्म Unacademy मधील एक शिक्षक, करण सांगवान हे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. सांगवान यांनी एका सेशनमध्ये विद्यार्थ्यांना सुशिक्षित राजकारण्यांना मत देण्याचे आवाहन करण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सांगवान विद्यार्थ्यांना देत सांगतात की, जागांची नावं बदलणाऱ्या राजकारण्यांना मत देऊ नका आणि त्याऐवजी मजबूत शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून द्या. राजकारण्यांचे शिक्षण व अनुभव हा नेहमीच वादाचा मुद्दा असताना सांगवान यांच्या मतावर मात्र नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमकी नेटकऱ्यांची टीका काय आहे हे पाहूया..

L.L.M ची पदवी घेतलेले शिक्षणतज्ज्ञ, सांगवान हे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकसभेत प्रस्तावित केलेल्या विधेयकावर चर्चा करत होते. ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा बदलण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.

या विधेयकावर निराशा व्यक्त करताना सांगवान म्हणाले, “मला हसावे की रडावे हे देखील समजत नाही कारण माझ्याकडे अनेक कायदे, केस आणि मी तयार केलेल्या नोट्स आहेत. तुम्हाला देखील एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे.”

भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सुशिक्षित व्यक्तींना राजकीय प्रतिनिधी म्हणून निवडण्याची गरज आहे, सुशिक्षित व गोष्टी समजून घेणार्‍या व्यक्तीला निवडून द्या. ज्याला फक्त नावे बदलता येतात, अशा व्यक्तीला निवडून देऊ नका. योग्य निर्णय घ्या.”

आता यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करताना सांगवान यांच्यावर शिक्षणाच्या नावाखाली राजकीय प्रचार केल्याचा आरोप केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “सध्याच्या सरकारने कायदे बदलले आहेत, अधिक आधुनिक संहिता जोडल्या आहेत आणि टाळासुरवातीपासून सर्वकाही पुन्हा शिकावे लागेल याबद्दल तो नाराज आहे. हाच माणूस नंतर चहा पिताना गप्पा मारत म्हणेल की भारतीय कायदे आणि संहिता अजूनही ब्रिटीशकालीन आहेत आणि सरकार त्यांना बदलत नाही.”

हे ही वाचा<< फूटपाथच्या खालून भयंकर आवाज येत होता; हिंमतीने लाद्या खणताच जे बाहेर निघालं…पाहून व्हाल हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे अनेकांनी सांगवान यांच्या म्हणण्याचे समर्थन केले आहे. राजकारण्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समजून घ्या हा प्रत्येक शिक्षकाने व जबाबरदार नागरिकाने द्यायला व पाळायलाच हवा असा सल्ला आहे. यातही टीका करणाऱ्यांचा हेतू काय हेच कळत नाही. अशा सकारात्मक कमेंट्स सुद्धा या पोस्टवर दिसत आहेत. तुमचं याविषयी काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवा.