scorecardresearch

Video viral: प्रवाशांची गर्दी, AC लोकलचा दरवाजा उघडाच? पाहा काय घडलं

video viral : हल्ली एसी लोकही पूर्णपणे भरलेली असते. दरम्यान याच गर्दीमुळे आज सकाळी विरार चर्चगेट दरम्यान धावणारी लोकल चक्क दरवाजे बंद न करता धावली.

Ac local
एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड ( सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. अगदी भल्या पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत ती धावत असते. लाखो मुंबईकर यामधून प्रवास करत आपल्या कामाचं ठिकाण गाठतात. लोकलची गर्दी मुंबईकरांसाठी नवी नाहीये. याच गर्दीसाठी पर्याय काढत एसी लोकलही सुरु करण्यात आल्या. मात्र मुंबईकरांची प्रवासी संख्या इतकी आहे की, ती एसी लोकही पूर्णपणे भरलेली असते. दरम्यान याच गर्दीमुळे आज सकाळी विरार चर्चगेट दरम्यान धावणारी लोकल चक्क दरवाजे बंद न करता धावली.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा मिरारोड स्थानकातील असल्याचं कळत आहे.काही तांत्रिक बिघाडांमुळे या एसी लोकलचा दरवाजा मिरारोड दहीसर स्थानकाच्यामध्ये उघडाच राहिला होता. मात्र थोड्यावेळानं एसी लोकल दहिसर स्थानकात गेल्यानंतर प्रवाशांनीच दरवाजा थोडा नीट केला आणि पुन्हा ट्रेनचे दरवाजे व्यवस्थित बंद झाले. यावेळी प्रवाशाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती मात्र थोड्याच वेळात तांत्रिक बिघाड दुरूस्त झाला आणि मोठा अनर्थ टळला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ऐकावं ते नवलच! चुलीवरचं मटण, मिसळ आणि आईस्क्रीमनंतर आलाय चुलीवरचा बाबा; video viral

या प्रकारानंतर रेल्वेने प्रवाशांनी चढताना-उतरताना एसी लोकलचा दरवाजे अडवण्याचा प्रयत्न करु नये असं आवाहन केलं आहे. यामुळे तांत्रिक त्रृटी निर्माण होतात आणि विनाकारण ट्रेन उशिराने धावतात परिणामी इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान एवढं तिकीट दर असून असे तांत्रिक बिघाड होत असतील तर सर्व सामान्यांनी काय करायचं असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 19:26 IST

संबंधित बातम्या