Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर डान्स सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जोडपे डान्स करताना दिसत असेल. त्यांच्या अवती भोवती काही नातेवाईक आणि कुटुंबातील लोक बसलेले दिसत आहे. सर्व जण आवडीने त्यांचा डान्स पाहताना दिसत आहे. हे जोडपे अतिशय सुंदर दिसत आहे. “मैं राजा तुम रानी हो, ऐसी प्रेम कहाणी हो” या गाण्यावर हे जोडपं डान्स करत आहे. पत्नीने सुंदर साडी नेसली आहे. डोक्यावर पदर घेतला आहे. अगदी साध्या सोप्या डान्स स्टेप्स करत हे दोघेही सुंदर डान्स करत आहे. या पती पत्नीमधील प्रेम पाहून कोणीही थक्क होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
bhavana_mukati and vjmukati या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यांना पाहून देव सुद्धा खूश झाला असेल” तर एका युजरने लिहिलेय, “संस्काराने भरलेल्या आठवणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक वेगळाच सुकुन मिळाला हा व्हिडीओ पाहून” आणखी एका युजरने लिहिलेय, “मर्यादेमध्ये राहून सुंदर डान्स करता येतो, याचे सुंदर उदाहरण” एक युजर लिहितो, “हा व्हिडीओ मी कितीदा पाहिला” तर एक युजर लिहितो, “किती गोड व्हिडीओ आहे.. देवा यांना सर्व आनंद मिळो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडीओवर लाखो लाइक्स आणि व्ह्यूज आले आहेत.
या जोडप्याचे नाव भावना मुकाटी आणि विजय मुकाटी आहे. हे दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचे व्हिडीओ शेअर रतात. त्यांच्या प्रत्येक डान्सवर लोक लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी असे अनेक डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत.