Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक बैल चक्क स्कुटर घेऊन पळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बैलाने थेट पळवली गाडी
तुम्ही आजवर रस्त्याच्या शेजारी पार्क केलेल्या गाड्या कोणी चोरून नेलेल्या पाहिल्या असतील. पण या व्हिडीओमध्ये चक्क बैल स्कुटर पळवून नेताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या शेजारी एक स्कुटर पार्क केलेली दिसेल. रस्त्याने जाणारा बैल या स्कुटरजवळ जातो आणि या स्कुटरवर चढून वेगाने स्कुटर पुढे नेतो. बैलाने ज्या प्रकारे स्कुटर पळवली, ते पाहून कोणालाही क्षणभरासाठी धक्का बसेल. काही लोकांना हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
bhUpi Panwar या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माणसांना चोरी करताना अनेकदा बघितले असेल पण ऋषिकेश मध्ये स्कूटी चोरीचे हे प्रकरण थोडे वेगळे आहे. येथे रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट बैलाला सुद्धा बाइक स्कुटी चालवायला आवडते”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावाला टेस्ट ड्राइव्ह करायची” तर एका युजरने लिहिलेय, “मागच्या जन्मी हा बैल माणूस असेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे कलियुग आहे, येथे काहीही अशक्य नाही.”
एक युजर लिहितो, “बैल चोरी करत नाही, तर फक्त चालवायचा प्रयत्न करतोय” तर एक युजर लिहितो, “कलियुगमध्ये अशा लहान मोठ्या गोष्टी होत असतात” एक युजर लिहितो, “हा भारत आहे, येथे काहीही होऊ शकतं” अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.