प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ सर्वांनाच आवडतात. सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात, अनेकवेळा प्राणी असे काही करतात जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित होतात. त्यापैकी केव्हा, काय व्हायरल होईल? हे काही सांगता येत नाही. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. त्याने डरकाळी फोडली की त्याचा दुरून आवाज ऐकूनच कित्येक प्राणी पळून जातात. पण ज्याला जंगलातील सर्व प्राणी घाबरतात अशा जंगलाच्या राजाला एवढासा कासव कसा सामोरा जाईल? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नदीच्या काठावर सिंह पाणी पिण्यासाठी आला होता. तेव्हा पाण्यातील कासव त्याच्या समोर आलं आणि सिंहाला पाणी पित देत नव्हता. हा कासव सिंहाच्या तोंडाजवळ जाऊन वारंवार वार करत होता. जेव्हा सिंह त्या कासवाला पाहतो तेव्हा आधी त्यालाही धक्का बसतो पण दुसऱ्याच क्षणी तो आपलं तोंड तेथून बाजूला नेतो आणि पुन्हा पाणी पिऊ लागतो, तेथे देखील हा कासव येतो आणि सिंहाला पाणी पिऊ देत नाही. सिंहाचे लक्ष खरंतर त्याची तहान भागवण्याकडे असतं, त्यामुळे तो कासवाकडे लक्ष देत नाही आणि पुन्हा पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण पुन्हा एकदा कासव त्याला त्रास देण्यासाठी पोहोचतो. कासव त्याला वारंवार त्रास देतो आणि सिंह वारंवार तेथून दूर जातो. कासवाला सिंहाला पाणी पिऊ द्यायचे नाही असे दिसते.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – तिच्यासाठी कायपण! या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं, Video च्या प्रेमात पडाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर इवल्याशा कासवासमोर सिंहाला हार मानलेली पाहू नेटकरी हा व्हिडीओ आश्चर्याने पाहात आहेत आणि शेअर देखील करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.