Viral video: जगभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रंगेबीरंगी या उत्सवात प्रत्येकजण न्हाऊन निघाला मात्र या उत्सवाला उत्तरप्रदेशमधील एका घटनेने गालबोट लागले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तरुणांच्या एका गटाने केलेले धोकादायक कृत्य व्हायरल झाले आहे. नोएडामध्ये होळीच्या आगीत मित्राला फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ग्रेटर नोएडातील बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली.

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाला होळीच्या राखेत फेकले जात असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. दरम्यान अचानक ५-६ जणांचा एक गट एका तरुणाला घेऊन जाताना दिसतो. त्यानंतर ते त्याला आवारात असलेल्या होळीच्या राखेजवळ घेऊन जातात. त्यानंतर काही क्षणातच, हा गट तरुणाला राखेत टाकतात. तरुणांची ही मस्करी त्यांच्या चांगलीच अंगलट आली, कारण ती राख अजूनही गरम असल्यानं राखेत फेकलेल्या तरुणाचे पाय भाजले आणि तो जखमी झाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, राखेत पडल्यानंतर हा तरुण जीव वाचवण्यासाठी लगेचच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्याचबरोबर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पैशांपेक्षा शरीर जास्त महत्वाचं” चोरानं दुकानं फोडण्यापूर्वी केला योगा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

होळीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना समोर येतात. होळीच्या आगीत मित्राला फेकल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. या तरूणाला मित्रांनी चेष्ठेमध्ये आगीत फेकलं की जाणूनबुजून फेकलं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु मुलगा आगीत जखमी झाला आहे. त्याचे दोन्ही पाय भाजले आहेत. हा व्हिडीओ @kavitaChau32946 या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकजण कमेंट करुन संताप व्यक्त करत आहेत.