Trending News: एखादा चुकून आलेला मेसेज एकतर माणसाचं नशीब पार बदलून टाकू शकतो किंवा अगदी जीव धोक्यात आणू शकतो. आता समजा जर तुम्हाला चुकून मेसेज आला की तुम्हाला एक लॉटरी लागली आहे आणि तुम्ही कोट्याधीश झाला आहात तर? आनंदाला काही परवारच उरणार नाही हो ना? आणि तेच दुसरीकडे तुम्हाला असा मेसेज आला की तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे तर? मंडळी हा मेसेज एका दुसऱ्याला नाही तर काही शे लोकांना पाठवण्यात आला आहे आणि तो पण चक्क एका हॉस्पिटलमधून. नेमकं काय आहे हे प्रकरण चला तर जाणून घेऊयात..

बीबीसीच्या अहवालानुसार, इंग्लंडमधील एका रुग्णालयाने डॉक्टरांच्या नेहमीच्या “मेरी ख्रिसमस” च्या शुभेच्छांऐवजी शेकडो रुग्णांना “फुफ्फुसाचा कर्करोग” असा मजकूर पाठवला. २३ डिसेंबर रोजी, दक्षिण यॉर्कशायरच्या डॉनकास्टर येथील आस्कर्न मेडिकल सेंटरमधील रूग्णांना नजरचुकीने हा मेसेज पाठवला गेल्याचे समजत आहे.

heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक

प्राप्त माहितीनुसार रुग्णांना या मेसेजमध्ये DS-1500 फॉर्म भरण्यास सांगितले गेले, जे दीर्घकालीन रोगांशी लढणाऱ्या रुग्णांना सवलत व फायदे मिळवून देण्यासाठी आवश्यक आहेत असे लिहिले होते . रुग्णांना “मेटास्टेसेससह फुफ्फुसाचा कर्करोग” असल्याचे निदान झाले, असे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते.

ही चूक लक्षात येताच हॉस्पिटलकडून पुन्हा सुधारणा करून मेसेज पाठवण्यात आला होता. नवीन मेसेजमध्ये लिहिले होते की, “कृपया पाठवलेल्या मागील मेसेजबद्दल आम्ही क्षमा मागतो. हा मेसेज चुकून आला होता व मूळ मेसेज तुम्हाला ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो असा होता”.

(फोटो: ट्विटर)

हे ही वाचा<< Video: हृदयाने साथ सोडली, १० मिनिट शून्य हालचाल आणि तेवढ्यात ‘तो’ आला.. IKEA मधील थक्क करणारा अनुभव

दरम्यान, हा मेसेज प्राप्त झाल्यावर अनेकांची धांदल उडाली होती. नॉर्टनमधील ५८ वर्षीय प्रॉपर्टी डेव्हलपर ख्रिस रीडने द इंडिपेंडंटला सांगितले की, मेसेज आल्यावर माझ्या पार्टनरने रडून घर डोक्यावर घेतलं होतं. आम्ही तर ऑपरेशनची सुद्धा तयारी करू लागलो होतो. हॉस्पिटलला संपर्क केला असता त्यांच्या लाईन व्यस्थ लागत होत्या.