‘वो स्त्री है कुछ भी कर सकती है’ महिलेचा जुगाड पाहून म्हणाल; काय डोक लावलंय..मानलं बुवा !

desi jugad viral : महिलेने बचत व्हावी म्हणून तिच्या नवऱ्यासाठी केलेल्या जुगाडाची चांगलीच चर्चा आहे. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है.

desi jugad
महिलेचा देसी जुगाड(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्येही काहीजण असे जुगाड करतात की डिग्री घेतलेला इंजिनीअरही फेल होईल. त्यात जर हा जुगाड एखाद्या महिलेने केला तर तो नक्की आगळा वेगळा ठरतो. महिला या बचतीसाठी काहीही करु शकतात हे आपल्याला माहिती आहे. अशाच एका महिलेने बचत व्हावी म्हणून तिच्या नवऱ्यासाठी केलेल्या जुगाडाची चांगलीच चर्चा आहे. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

बेडसीटचा बनवला प्रोजेक्टर –

तर झालं असं की, नवऱ्याला छोट्या स्क्रिनवर चित्रपट पाहून कंटाळा आला होता, त्याला मोठ्या स्क्रिनवर प्रोजेक्टरवर चित्रपट पाहण्याची इच्छा झाली. त्यानंतर त्यानं बेडरुममध्ये प्रोजेक्टर लावण्याची इच्छा त्याच्या बायकोसमोर व्यक्त केली. मात्र हा प्रोजेक्टर लावण्यासाठी २० ते २५ हजाराचा खर्च येणार होता. मग बायकोने असं डोक लावलं की पाहून तुम्हीही म्हणालं मानलं बुवा. या महिलेने एक मोठी पांढऱ्या रंगाची बेडसीट काढली आणि त्याची चारही टोक बांधली. त्यावर स्क्रीन लावून प्रोजेक्टरचा घरच्या घरी अनोखा जुगाड केला. आता यावर तिचा नवरा चित्रपट पाहत असल्याचंही दिसत आहे.

पाहा पोस्ट –

हेही वाचा – इन्स्टाग्रामवर तरुणाची suicide note व्हायरल..’गुडबाय’ म्हणत तरुण निघाला तेवढ्यात पोलिसांनी केलं असं काही की; तुम्ही म्हणाल…

या पोस्टला आतापर्यंत ६ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असे जुगाडचे अनेक किस्से समोर येत असतात. सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरलही होतात. जुगाड करुन लोक अनेक विचित्र, हटके, मजेशीर गोष्टी तयार करत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 14:15 IST
Next Story
Matrimonial sitesचा असाही वापर; महिलेने जीवनसाथी डॉटकॉमची मदत घेत मिळवली नोकरी, वाचा सविस्तर
Exit mobile version