कोणत्याही गोष्टीत अपयश आले तरी आपण लगेच निराश होतो. २१ व्या शतकातल्या पिढीला सगळं काही क्षणात उपलब्ध होण्याची सवय झाली आहे. खायला काही ऑर्डर केले की काही मिनिटांमध्ये दारात हजर! ऑनलाईन एखादा शर्ट आवडला तर लगेच ऑर्डर करून एक दोन दिवसांमध्ये त्याची घरी डिलीवरी येते. म्हणजे कोणत्याही गोष्टीची वाट पाहणे किंवा एखादी गोष्ट मिळण्यासाठी संयम बाळगणे आत्ताच्या पिढीला कठीण जाण्यामागे त्यांना उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा देखील तितक्याच जबाबदार आहेत. प्रत्येक गोष्ट काही वेळातच हातात उपलब्ध होण्याची सवय असल्याने यश देखील कमी प्रयत्नात किंवा लगेच मिळावे असे वाटते आणि तसे न झाल्यास अनेकजण निराश होतात. याच्याशी निगडित असणारा, प्रयत्न आणि यश यावर भाष्य करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण करत असलेले प्रयत्न आणि देवाने आपल्यासाठी केलेले नियोजन अशी विभागणी केलेली दिसत आहे. फोटोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की आपण स्वतःसाठी केलेले नियोजन हे सरळ आणि सोप्पे असते, पण देवाने आपल्यासाठी ठरवून ठेवलेला यशापर्यंतचा रस्ता हा अनेक अडचणींनी भरलेला असतो असे चित्र दाखवण्यात आले आहेत. ‘कधीकधी आपण जसा विचार करतो तशा गोष्टी घडत नाहीत, कारण देवाने आपल्यासाठी त्यापेक्षा काही चांगले नियोजित केलेले असते.’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..

आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केलेला फोटो :

जीवनाचा अमूल्य अर्थ सांगणारा हा फोटो नेटकऱ्यांना भावला असून, अनेक जणांनी यावर कमेंट करत या विचाराशी सहमत असल्याचे सांगितले आहे.