सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. नुकतेच असेच काहीसे व्हायरल झाले आहे, जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. एव्हरेस्ट मॅरेथॉनवर चढाई करतानाचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ युनायटेड किंगडममधील (United Kingdom) वन्यजीव छायाचित्रकाराचा (Wildlife Photographer) आहे, ज्याने मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी टायगर सूट घालून एव्हरेस्ट मॅरेथॉनवर चढाई केली.

कारण काय?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ५९ वर्षीय वन्यजीव छायाचित्रकार पॉल गोल्डस्टीन टायगर सूट घालून एव्हरेस्ट मॅरेथॉनवर चढताना दिसत आहेत. धोक्यात असलेल्या बंगाल वाघिणीसाठी पैसा उभा करण्याच्या उद्देशाने त्याने असं केल्याचे बोलले जात आहे, जेणेकरून त्याला वाघ वाचवण्यात मदत होईल. बंगाल वाघांच्या संवर्धनासाठी पॉल गोल्डस्टीनने वर्थ मोअर अलाइव्ह मोहिमेद्वारे आतापर्यंत सुमारे २ कोटी रुपये जमा केल्याचे सांगण्यात येत आहे.

(हे ही वाचा: मुलीने हार घालण्यास नकार दिल्याने वराला आला राग आणि… ; बघा Viral Video)

(हे ही वाचा: जन गन मन… थेट माउंट एव्हरेस्टवरुन; भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा राष्ट्रगीत गातानाचा Video Viral)

पॉल गोल्डस्टीनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो टायगर सूट घालून ट्रेक करताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एव्हरेस्ट मॅरेथॉन, ही मॅरेथॉन स्प्रिंट नसून अर्ध्याहून अधिक मार्ग आहे.’ व्हिडीओ पाहून यूजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर युजर्सनाही या पोस्टला खूप पसंती मिळत आहे. काही युजर्स गोल्डस्टीनच्या स्पिरीटला सलाम करत आहेत, तर काही त्याचे कौतुक करत आहेत.

(हे ही वाचा: “आकस्मिक निधनाची बातमी समजल्यानंतर…”; ‘के के’च्या निधनानंतर राहुल गांधींची पोस्ट)

(हे ही वाचा: Video: मोदींनी आठ वर्षात ‘इतक्या’ देशांना दिली भेट; जाणून घ्या खर्चाचा आकडा)

या व्हिडीओमध्ये पॉल गोल्डस्टीनने देणगी देणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. गोल्डस्टीनच्या वेबसाइटनुसार, या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॉल गोल्डस्टीनने बंगाल वाघांच्या संवर्धनासाठी वर्थ मोअर अलाइव्ह मोहिमेद्वारे २००,००० पौंडांपेक्षा जास्त कमाई केली आहे. टायगर सूट परिधान करून त्याने आतापर्यंत एकूण १९ मॅरेथॉन कव्हर केल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की दरवर्षी २९ मे रोजी एव्हरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.