Viral Video 7 Girls Jump while dancing creates sinkhole in ground watch crazy moves | Loksatta

Video: ७ तरुणींनी नाचत अशी उडी मारली की रस्त्यात खड्डाच पडला आणि मग.. पाहा ‘हा’ थरकाप उडवणारा क्षण

Viral Video Dancing: रस्त्यावर नाचत असताना या तरुणींच्या बाबत जे घडलं त्याने त्यांना आयुष्यभराचा धडा मिळाला असणार हे निश्चित!

Video: ७ तरुणींनी नाचत अशी उडी मारली की रस्त्यात खड्डाच पडला आणि मग.. पाहा ‘हा’ थरकाप उडवणारा क्षण
Viral Video 7 Girls Jump while dancing creates sinkhole (फोटो: स्क्रिनशॉट)

Viral Video Today: टिकटॉक बॅन झाल्यावर आता इंस्टाग्राम रीलला सुद्धा डान्स शोचे स्वरूप आले आहे. यातील काही व्हिडीओ नक्कीच कौतुकास्पद असतात तर काही मात्र केवळ अधिक व्ह्यूज मिळावेत यासाठी केलेला खटाटोप असल्याचे स्पष्ट दिसून येते. व्ह्यूजच्या नादात आजवर रस्त्यावर उतरून, ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये डान्स करणाऱ्या तरुणी तुम्हीही पहिल्या असतील. काही महिन्यांपूर्वी तर अशाच एका तरुणीला मेट्रोत डान्स केल्यावरून पोलिसांनी पकडून समज दिली होती. तरीही हे सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ बनवण्याचे वेड काही केल्या कमी होत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे, विशेष म्हणजे रस्त्यावर नाचत असताना या तरुणींच्या बाबत जे घडलं त्याने त्यांना आयुष्यभराचा धडा मिळाला असणार हे निश्चित!

नेमका हा व्हिडीओ आहे तरी काय? असा प्रश्न आता आपल्यालाही पडला असेलच ना? तर झालं असं की.. एक ब्राझीलमधील तरुणींचा ग्रुप एका घराच्या मागच्या अंगणात व्हिडीओ शूट करण्यासाठी डान्स करत होता. यामध्ये सात तरुणी आता आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करायला सज्ज असल्याचं दिसतंय. त्या नाच सुरु करतात इतक्यातच यातील एक तरुणी रस्त्यातील खड्ड्यात पडते.

व्हिडीओ मध्ये तरुणी हात धरून गोल करून नाचत आहेत. इतक्यात अंगणातील सिमेंट तुटून अचानक खड्डा होतो व त्यात या तरुणी कोसळतात. सुदैवाने यामुळे त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. मात्र आता नाचताना अकाय काळजी घायवी याचा त्यांना चांगलाच धडा मिळाला असावा.

Video: नव्या संकटाची चाहूल? केदारनाथ मंदिराजवळ १० दिवसात दुसऱ्यांदा हिमपर्वत कोसळला; पाहा ‘हा’ क्षण

नाचताना खड्ड्यात पडल्या सात जणी व्हायरल व्हिडीओ

दरम्यान व्हिडिओमध्ये दिसणारी ३८ वर्षीय, गॅब्रिएला कार्व्हालो, यांनी ब्राझिलियन न्यूज आउटलेट G1 ला सांगितले की त्यांना तिच्या आजीच्या घरी जमिनीचा भूकंप जाणवला आणि त्यामुळेच हा खड्डा पडला असावा मुख्य म्हणजे या अपघातांनंतरही उठून या तरुणी पुन्हा नाचताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dussehra 2022: सोन्याची लक्ष्मी सजली, ६ कोटी रुपयांच्या नोटांची आरास, १३५ वर्ष जुन्या श्रीमंत देवीचे रूप पाहा

संबंधित बातम्या

Viral Video: लग्नाला नकार दिला म्हणून मुलीचं अपहरण, मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या कुटुंबीयांवर रोखली बंदूक अन्…
देशी जुगाड! मुलाने बनवली भन्नाट गाडी, केवळ १० रुपयांमध्ये पार करणार १५० किलोमीटरचं अंतर
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
VIDEO : अशी घडवली किम जाँग ऊनच्या सावत्र भावाची हत्या
मुरली विजयला पुत्ररत्न, मित्राच्या गर्भवती पत्नीसोबत केला होता विवाह

व्हिडिओ

ताज्या बातम्या
केंद्राने देशभर समान नागरी कायदा लागू करावा!; शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत : राज
विश्लेषण : रॉय दाम्पत्याचे काय चुकले? 
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर