जगातील सर्वाधिक चमचे शरीरावर बॅलेंस करण्याचा विचित्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एका इराणी व्यक्तीने केला आहे. इराणमधील कारज येथे राहणाऱ्या ५० वर्षीय अबूफजल साबेर मोख्तारीने नुकताच हा विश्वविक्रम केला आहे. मोख्तारी सांगतात, “लहानपणी मला या टॅलेंटची अचानक ओळख झाली. पण अनेक वर्षांच्या सरावानंतर आणि मेहनतीनंतर मी ही प्रतिभा मजबूत करू शकलो आणि आज मी जिथे आहे, तिथे पोहोचलो.”

अबूफजलने तिसऱ्या प्रयत्नात हा विचित्र विश्वविक्रम केला आहे. याआधी शरीरावर सर्वाधिक चमचे बॅलेंस करण्याचा विक्रम स्पेनच्या मार्कोझ रुईझ सेबालोजच्या नावावर होता. त्याने शरीरावर ६४ चमचे बॅलेंस केले होते.

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

व्हिडीओ व्हायरल

अबूफझलचा एक व्हिडीओही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या अंगावर एक एक चमचे ठेवले जात आहेत. अबूफझल मोख्तारी या चमच्यांना त्याच्या शरीरात चुंबक जोडल्याप्रमाणे बॅलेंस करतो.गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या टीमशी बोलताना मोख्तारी स्पष्ट करतात की त्यांच्याकडे विशेष शक्ती आहे असा त्यांचा विश्वास आहे. ते म्हणतात की त्यांच्याकडे अशी क्षमता आहे की ते त्यांच्या शरीराची ऊर्जा त्यांच्या शरीराला चिकटलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये हस्तांतरित करू शकतात.

(हे ही वाचा: Thar चालवतचं घेतले लग्नाचे सात फेरे; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video)

(हे ही वाचा: लग्नात वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि…; पहा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अबूफझल म्हणतात, “मी माझ्या शरीराची उर्जा ज्याला स्पर्श करू शकतो आणि अनुभवू शकतो अशा कोणत्याही गोष्टीमध्ये हस्तांतरित करतो. त्यानंतर मी शक्य तितके त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो म्हणून मी हा पराक्रम करू शकतो.अबूफझल साबेर मोख्तारी यांना इराणचा मॅग्नेट मॅन म्हणूनही ओळखले जाते. असे गिनीज रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले. “मी माझ्या शरीराला काहीही चिकटवू शकतो, अगदी माणसालाही. हे सर्व एकाग्रता आणि ऊर्जा हस्तांतरित करण्याबद्दल आहे.”