करोना विषाणूमुळे देशातील विविध शहरात सध्या सशर्त लॉकडाउन सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कच्या वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरणं बंधनकारक झालं आहे. जवळपास सर्वजण या नियमांचं पालन करत आहेत. मात्र, काही गरिब याचं पालन करताना दिसत नाही. त्यासाठी प्रशासन देखरेख करत आहे. प्रशासनातील आधिकारी अशा व्यक्तींना समज देतात तर काहीवेळा त्यांच्याकढून दंडही वसूल करतात. कर्तव्य बजावणाऱ्या या आधिकाऱ्यांची सतत सोशल मीडियावर चर्चा असते. अशाच एका जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या जिल्हाधिकाऱ्यानं एका भाजीविक्रेत्या आजीकडून संपूर्ण भाजीपाला विकत घेतला.

अनेकवेळा प्रशासनामधील काही आधिकाऱ्यांच्या अमानवी कृत्यमुळे त्यांच्या टीका होते. पण या जिल्हाधिकाऱ्यानं सर्वांना माणुसकी शिकवली आहे. लॉकडाउनमध्ये भाजीपाला विकून स्वत:च आणि कुटुंबाची भूक भागवणाऱ्या आजीला मदत करत जिल्हाधिकारी सध्या चर्चेत आहे. जिल्हाधिकाऱ्याच्या या कार्याचं कौतूक होत आहे.

लॉकडाउनमध्ये एक आजी भाजीपाला विकत आहे. करोना विषाणूमुळे घरातच राहा सुरक्षित राहा असे सांगितलं जातं मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी ही आज रस्त्यावर भाजीपाला विकत होती. त्याचवेळी कर्तव्य बजावत असलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या ही गोष्ट लक्षात आली. जिल्हाधिकाऱ्यानं तात्कळा त्या आजीकडे विनंती केली. त्यानंतर त्यानं आजीकडील सर्व भाजीपाला विकत घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाध्याक्ष ऐवढ्यावरच थांबला नाही. त्या आजीला सर्वकाही पूर्वरत होईल याचा विश्वास दिला. त्यानंतर त्या आजीकडे मास्क नव्हता हेही त्या आधिकाऱ्याच्या लक्षात आला. त्यानं तात्काळ मास्क मागवत त्या आजीला देत माणुसकीचं दर्शन घडवलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून नेटकरी त्या जिल्हाध्याक्षावर फिदा झाले आहे.