लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. काही वेळा आपल्याला एखादी वस्तू हवीच म्हणून ते हट्टाने पेटतात आणि घरातच नव्हे तर घराबाहेर कुठेही खेळू लागतात, धिंगाणा घालतात. आपल्या आजुबाजूला काय सुरूय याचं त्यांना काही देणंघेणं नसतं. ठिकाण कोणतंही असो त्यांचं खेळणं त्यांना महत्त्वाचं असतं. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. राष्ट्रपती स्टेजवर भाषण करत असताना अचानक हा मुलगा सायकल चालवत स्टेजवर आला आणि पुढे त्याने काय केलं हे पाहून पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चिली देशाचे राष्टाध्यक्ष गॅब्रिएल बोरिक हे स्टेजवर भाषण देताना दिसून येत आहेत. त्यांचं भाषण सुरू असताना मागून अचानक एक छोटा सुपरमॅन चक्क सायकल चालवत येताना दिसला. हा छोटा चिमुकला सुपरमॅन सायकलवरून स्टेजवर आलेला पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. प्रत्यक्षात तो सुपरमॅन नव्हता, तर सुपरमॅनच्या पोशाखात आलेला एक लहान मुलगा होता. हा चिमुकला सायकल चालवत स्टेजवर आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या बाजूला थांबून काही वेळ त्यांच्याकडे पाहत असतो. थोडं थांबून पुन्हा तो आपली सायकल सुरू करतो आणि आपल्या इवल्याश्या सायकलवरून राष्ट्राध्यक्षांच्या भवती गोलगोल घिरट्या घालू लागतो. राष्ट्राध्यक्षांच्या भाषण ऐकण्यासाठी आलेल्या लोकांचं लक्ष या चिमुकल्या मुलाने वेधून घेतलं.

आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. स्थानिक आउटलेट 24 Horas नुसार, चिली देशाचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक हे संविधानाच्या नवीन मसुद्याला मतदान करण्यासाठी नागरिकांशी संवाद साधत होते. त्यावेळी हा चिमुकला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष बोरिक चिलीवासियांना नवीन राज्यघटनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे मत देण्याचे आवाहन करत होते, जे शेवटी जबरदस्त बहुमताने नाकारले गेले. राष्ट्रपती उत्कटतेने बोलत होते. पण लाल टोपी घातलेला आणि निळ्या रंगाचा सुपरमॅन सायकल चालवत त्यांच्याभवती गोलगोल फिरत होता. त्याचे निळ्या रंगाचे हेल्मेट दुचाकीच्या हँडलला लटकले होते.

आणखी वाचा : हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हत्ती फिरताना दिसले, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

davidrkadler नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ३३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. नेटकऱ्यांनी ही यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहीलं की, “आज किमान काहीतरी छान घडलं”.

आणखी वाचा : एक मगर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात धावताना दिसली, जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : स्मार्टनेसच्या बाबतीत कुत्रेही काही कमी नाहीत, पाहा पायऱ्यांवरून कसा भरभर उतरला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७.९ मिलियन चिली लोकांनी रविवारी संविधानाच्या मसुद्याच्या विरोधात मतदान केले. तर ४.९ मिलियन लोकांनी संविधानाच्या मसुद्याच्या बाजूने मतदान केले. हा देशाच्या ३६ वर्षीय राष्ट्राध्यक्षांना मोठा धक्का आहे ज्यांनी दत्तक घेण्याचे समर्थन केले.