Viral Video: आताच्या मुलांसाठी बाजारात नवनवीन खेळणी उपलब्ध आहेत. पण, ९० च्या दशकात एखादं खेळणं हवं असेल, तर आई-बाबांकडे हट्ट करावा लागायचा. तो हट्ट पूर्ण नाही झाला, तर स्वतःच काहीतरी जुगाड करून खेळणं बनवलं जायचं. जसे की, चाळीत क्रिकेट खेळायला स्टम्प नसतील, तर पुठ्ठे लावले जायचे. भांडी-भांडी खेळताना खाऊ मिळाला नाही, तर झाडाच्या पानांची पोळी आणि भाजी केली जायची. झोपाळा नसेल, तर झाडांच्या फांद्यांचा उपयोग केला जायचा. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन भावंडं जुगाड करून पाण्यातल्या खेळाचा आनंद लुटत आहेत.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, दोन भावंडांनी खूपच चातुर्यानं एक खेळ तयार केला आहे. अर्धवट पाणी साठलेल्या रस्त्यावर हा मनोरंजक खेळ सुरू होतो. एक मुलगा रस्त्यातील कोरड्या जागेवर कमरेला दोरी बांधून उभा आहे आणि दुसरा मुलगा रस्त्याच्या पाणी साचलेल्या भागात स्केटबोर्डवर उभा आहे. स्केटबोर्डवरील मुलानं त्याच्या भावाच्या कमरेला बांधलेली दोरी धरली आहे. दोघांनीही पोझिशन घेतल्यानंतर हा खेळ खऱ्या अर्थाने सुरू होतो. दोन्ही भावंडांनी नक्की काय केलं ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…महिलेने बँकेत पैसे जमा करताना रकमेएवजी डिपॉझिट स्लिपवर लिहिले असे काही की… बँक कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

वेकबोर्डिंग (Wakeboarding) हा खेळ पाण्यात खेळला जातो. तर, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हा खेळ पाण्यात खेळला जात आहे; पण त्याला एक नैसर्गिक टच देण्यात आला आहे. एक मुलगा स्केटबोर्डवर आणि दुसरा मुलगा कमरेला दोरी बांधून उभा आहे . पोझिशन घेतल्यानंतर हा खेळ सुरू होतो. रस्त्याच्या कोरड्या जागेवर उभा असलेल्या मुलगा धावण्यास सुरुवात करतो; जेणेकरून पाण्यातील स्केटबोर्डवर उभा असणारा मुलगा खेचला जाईल. अशा रीतीनं त्यांचा हा वेकबोर्डिंग हा खेळ यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. कुठेही दोघांचाही तोल गेला नाही. एकदम परफेक्ट वेळ, समतोल राखत दोघांनीसुद्धा या खेळाचा त्यांच्या पद्धतीनं आनंद लुटला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ त्या मुलांचे वडील रायन एन्क यांनी @ryanenk या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला असून, अनेकांनी भावंडांच्या चातुर्याचे कौतुक केले. अनेक लोकांनी आजकाल फोनमध्ये व्यग्र असणाऱ्या चिमुकल्यांना हायलाइट करीत व्हिडीओ गेम खेळण्याऐवजी नवीन शोधलेला गेम खेळताना पाहून खूप आनंद झाला. “हा खेळ खेळल्यानं धावणाऱ्या व्यक्तीचा वेगदेखील सुधारतो”, असंदेखील काही युजर्स म्हणत आहेत.