आपण भारतीय असे आहोत ना, की एखादी गोष्ट करू नका सांगितलं तरीही ती गोष्ट मु्द्दामहून करायला जातो. मग ‘थुंकू नका’ पाटीखालीच पानाच्या पिचकाऱ्या दिसतात. इथे पोस्टर लावू नका असं सांगणारं वाक्य तिथेच लावलेल्या पोस्टर्सच्या गर्दीत दबून जातं. ‘इथे पोहायला मनाई आहे’ असा बोर्ड लावलेल्या तलावातच दणादण उड्या पडतात. आणि ‘रेल्वेरूळ ओलांडू नका’ या वाक्याचं तर हसंच केलं जातं.
पण स्टेशनवर ठीक आहे. रेल्वे क्राॅसिंगच्या ठिकाणी काय करायचं. तिथे तर रूळ ओलांडावेच लागतात ना? अशा वेळी तिथे लोकांना सावध करायला लाईन्समन नेमलेला असतो. तसंच फाटकही केलेलं असतं. पण तरीही रेल्वे रूळ धोकादायक पध्दतीने ओलांडणारे महाभाग असतातच
पण ही प्रवृत्ती फक्त भारतीयांमध्येच नाही आहे तर जगातल्या कानाकोपऱ्यात अशी ‘महान’ व्यक्तिमत्त्वं सापडतातच. हा पुढचा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या या बाईचा जीव कसा थोडक्यात वाचला ते पहा
सौजन्य- यूट्यूब
हा न्यूझीलंडचा व्हिडिओ आहे. आॅकलंडजवळच्या एका रेल्वे क्राॅसिंगवर ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये बाकीचे लोकही रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहेत पण ते आसपासच्या जगापासून हरवेलेल वाटत नाही आहेत.
ही महिला एकतर ‘हूडी’ चा शर्ट घालून आली आहे. त्याचं ‘हूड’ तिने डोक्यावरून घेतलं आहे. त्यामुळे आजूबाजूचं दिसायची आधीच पंचाईत. त्यात गाडी डाव्या बाजूने येत असताना यांचं लक्ष उजवीकडे. बरं असंही नाही की ट्रेन येत असल्याचा काहीच सिग्लल दिला जात नव्हता. पण तरीही या सगळ्याकडे या बाईचं दुर्लक्ष झालं. अशा परिस्थितीत नशीब हात देतं ते असं. शेवटच्या क्षणाला का होईना या गाडीकडे लक्ष देल्याने या बाईने उडी मारत आपला जीव वाचवला.