Viral Video: दोन वेळचे पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत असतो. कष्ट करताना आलेल्या अडचणी, त्रास या सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. अनेक गरीब, अपंग व्यक्तीही काही ना काहीतरी काम करून पैसे कमावतात. खरे तर, माणूस पैसा किती कमावतो यापेक्षा तो समाजात जगताना स्वाभिमान तर गहाण ठेवत नाही ना, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, समाजात असे काही लोक आहेत, जे शरीराने धडधाकट असूनही फक्त जास्त पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी चोरी, लूटमार करतात. सोशल मीडियामुळे असे अनेक प्रकार वारंवार आपल्यासमोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

हल्ली लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षडयंत्रे आखून चोरी करतात. पण, वाईट कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच. कितीही चलाख चोर असला तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटत नाही. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला तरुणी अद्दल घडवताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या एका कडेला तरुणी कार थांबवून बाहेर उतरते. यावेळी तिथे स्कुटीवरून एक चोर येतो आणि तरुणीच्या हातातील पर्स चोरण्याचा प्रयत्न करतो. पण तरुणी पर्स लांब फेकते, ज्यामुळे चोर पर्स आणण्यासाठी जातो, तेवढ्याच तरुणी चोराच्या स्कुटीची चावी काढून घेते आणि तिच्या कारमध्ये जाऊन बसते. इतक्यात चोर पळत येतो आणि कारच्या खिडकीतून हात घालतो; परंतु तिथे त्याचा हात अडकतो. तरुणी पुन्हा बाहेर उतरते आणि पोलिसांना फोन करते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ केवळ मनोरंजन म्हणून शूट करण्यात आलेला आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tuzya_mazya_premachi_bharari या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “शाब्बास असंच पाहिजे याला”. दुसऱ्याने लिहिलेय, “आयुष्यात परत कधीच हा चोरी करणार नाही”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मजा आली”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.