Viral Video: लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य व गीत यांचा मिलाफ साधलेला असतो. लावणी नृत्यामध्ये कलाकार पायांत घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर ते सादर करतात. त्यामुळे हे नृत्य आकर्षक होऊन कित्येकदा प्रेक्षकांना ताल धरायला उद्युक्त करते. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. पूर्वी फक्त महिला लावणी सादर करायच्या; आता पुरुष मंडळीसुद्धा आवडीनं लावणी नृत्य सादर करताना दिसतात. या संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेच असतील. दरम्यान, आता एका महिलेने सादर केलेल्या लावणीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोय.
महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं घर, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला, हळदीच्या कार्यक्रमात लावणी सादर करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला हळदीच्या कार्यक्रमामध्ये ‘चंद्रा’ गाण्यावर लावणी सादर करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला ती महिला डोक्यावर पदर घेऊन तोडा सादर करते आणि त्यानंतर लावणी सादर करण्यास सुरूवात करते. यावेळी तिची लावणी अन् तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dj_panky या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत आणि यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
यावर एका युजरने लिहिलंय की, “किती छान नाचला ताई”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आयुष्य मनमुराद जगता आलं पाहिजे”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काकू तुमचे हावभावही खूप भारी आहेत.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कसल्या भारी नाचल्या”