Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स तुफान व्हायरल होतोय, ज्यात ती रस्त्यावर नाचताना दिसतेय.
सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. त्यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात, घरात किंवा अगदी कोणत्याही ठिकाणी डान्स करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय. ही महिला पावसामध्ये रस्त्यावर उभी राहून नाचताना दिसतेय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये रस्त्यावर उभी राहून डान्स करीत आहे. ही महिला ‘ही नवरी असली’ या गाण्यावर नाचताना दिसतेय. यावेळी महिला करत असलेला हटके डान्स पाहून सोशल मीडियावरील सगळे जण अवाक् झाले आहेत. त्यामुळे तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @laxmi266760 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात जगाचा विचार न करता जगणं”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मस्त डान्स केला ताई तुम्ही”, तर आणखी एकाने लिहिलेय, “प्रत्येक वयात मनमुराद जगता आलं पाहिजे”.