Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा एका कार्यक्रमातील डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. हल्ली अनेक शहरांमध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यात महिलांबरोबर खेळ खेळले जातात. त्यांच्यातील विविध कला सादर करण्याची त्यांना संधी दिली जाते. आता याच कार्यक्रमातील एका महिलेचा डान्स व्हायरल होतोय ज्यामध्ये ती सुंदर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या कार्यक्रमामध्ये एक महिला “तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का”, या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिचा डान्स पाहून आसपास जमलेल्या महिला तिला अजून प्रोत्साहन देतात. शिवाय सोशल मीडियावरही तिच्या डान्सचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rahul_tatya_barshikar_1165 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “नाद करती काय”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मस्त ताई”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “व्वा सुंदर नाचल्या ताई”